Tarun Bharat

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

डाॅ. डी. वाय. पाटील यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनाखाली 1989मध्ये सुरू झालेल्या मेडीकल कालेजने केवळ 16 वर्षात डीम्ड युनिव्हर्सिटीचा (अभिमत विद्यापीठ) दर्जा संपादन केला. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संशोधनाचीही संधी उपलब्ध करून दिली. आज बदलत्या काळाचा वेध घेत असताना शिक्षणातील गरज ओळखून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना एकाच छत्राखाली सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी लवकरच 21 मजली इमारत उभारण्याचा मानस डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.

डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या 16 व्या वर्षापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते ज्येष्ठ अर्थतज्ञ डाॅ. जे. एफ. पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार देवून गौरवण्यात आले. यावेळी डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डाॅ. राकेशकुमार मुदगल, प्र-कुलगुरू डाॅ. शिंपा शर्मा, अधिष्ठाता डाॅ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डाॅ. विश्वनाथ भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते. डाॅ. जे. एफ. पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कुलपती डाॅ. पाटील म्हणाले, मेडीकल काॅलेजच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना कमी खर्चात मेडिकलचे शिक्षण घेता आले. काॅलेजच्या स्थानिक 50 विद्यार्थ्यांनी आधुनिक हाॅस्पिटल उभारली आहेत. 500 बेडची क्षमता असलेल्या डी. वाय. पाटील हाॅस्पिटलच्या माध्यमातून रूग्णांना जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जात आहेत. कोरोना कालावधीत 450 कर्मचाऱयांनी रूग्णांना दर्जेदार सेवा दिल्यामुळे शासनाकडून गौरव करण्यात आला आहे. आतापर्यंत मेडीकल डीम्ड युनिव्हसिटीतून 3100 विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडले आहे. ते देशभर आरोग्य सेवा देत आहेत. दर्जेदार संशोधनासाठी आॅस्ट्रेलिया, चीन, इंग्लंड, अमेरिका या परदेशातील विद्यापीठासह आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठांबरोबर सामंज्यस करार केला आहे. मेडीकल युनिव्हर्सिटीने विविध प्रकल्प हाती घेतले असून कृषी विद्यापीठ या नवीन प्रकल्पाची भर पडली आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अॅड. धैर्यशील पाटील, डाॅ. डी. जी. कणसे, प्रताप उर्फ भैया माने, अमित कुलकर्णी, डाॅ. प्रताप पाटील, डी. वाय. पाटील सर्व स्टाफ आदी उपस्थित होते.

मेडीकल काॅलेजसाठी 21 मजली इमारत
मेडीकल विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा एकाच इमारतीत देण्यासाठी 21 मजली मेडीकल काॅलेजची इमारत उभारण्याचा मानस आहे. येत्या तीन महिन्यात इमारतीची पायाभरणी केली जाईल, तर तीन वर्षात इमारतीचे संपूर्ण बांधकाम पूर्ण केले जाणार आहे, असेही कुलपती डाॅ. संजय डी. पाटील यांनी सांगितले.

Related Stories

मुश्रीफांना चंद्रकांतदादांची भीती का वाटते?

Archana Banage

कोनोली पैकी पानारवाडीत पतीचा पत्नीकडून खून

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे 17 रुग्ण

Archana Banage

कोल्हापूर : साजणी येथे एक व्यक्ती पॉझिटिव्ह

Archana Banage

रिक्षा सौंदर्य स्पर्धेत राजू खतिफ यांच्या रिक्षाला प्रथम क्रमांक

Archana Banage

दाजीपूरचा जंगलवाचक शांताराम, वाचा जंगलातील कहाणी….

Rahul Gadkar
error: Content is protected !!