Tarun Bharat

ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे निधन

ऑनलाईन टीम / पुणे :

ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे आज पहाटे निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आज सकाळी त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisements

जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलं. जवळपास सहा दशकांच्या आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला होता. 2018 मध्ये त्यांनी 98 व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यांची एकमताने निवड झाली होती.

कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर 4000 हून अधिक प्रयोग झाले आहेत. संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोळ, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता.

Related Stories

रशियाकडून कोरोनाच्या दुसऱ्या लसीला मंजूरी

Rohan_P

सांगली : जनावरांना घातला दुधाचा अभिषेक, आटपाडी तालुक्यात आंदोलन

Abhijeet Shinde

कोरोना : दिल्लीत दिवसभरात 1257 नव्या रुग्णांची नोंद

Rohan_P

शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मिळणे हे, उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

Abhijeet Shinde

केजरीवालांच्या विधानांवर सिंगापूर संतप्त

Patil_p

महाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा ५० हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!