Tarun Bharat

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध

आमदार रुपाली नाईक यांचे प्रतिपादन : ज्येष्ठ नागरिक कल्याण संघटनेचे उद्घाटन

प्रतिनिधी / कारवार

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी संघ सुरू करणे ही अतिशय प्रशंसनीय बाब असल्याचे आमदार रुपाली नाईक यांनी सांगितले. त्या कारवार तालुक्यातील मुडगेरी येथे ज्येष्ठ नागरिक कल्याण संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपणाला आदर आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू असे स्पष्ट करून आमदार नाईक पुढे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य किंवा केंद्र सरकारकडून मिळणाऱया सर्व प्रकारच्या सुविधा मिळवून देण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न राहील. मुडगेरी येथे गुरुवारी उद्घाटन केलेल्या ज्येष्ठ नागरिक कल्याण संघटनेच्या स्वतःच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास इमारत बांधून देण्यास आपण प्रयत्न करू, असे आश्वासन देऊन पुढे म्हणाल्या, तातडीच्यावेळी गरजूंना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून आमदार निधीतून रुग्णवाहिका व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ही व्यवस्था जनतेला उपलब्ध होईल. ज्येष्ठ नागरिकांना एकांतपणामुळे वेळ घालविण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांची  स्वतःची संघटना असल्यास ते हक्काने एकत्रपणे येऊ शकतात असेही नाईक यांनी सांगितले.

यावेळी आमदार नाईक यांचा सत्कार करण्यात आला. ता. पं. सदस्य सुरेंद्र गावकर, ग्रा. पं. सदस्य दीपक येरंडेकरसह संघाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Related Stories

स्वस्तिक पाटीलची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

गाळे रिकामी करण्यासाठी कारवाईचा विचार

Amit Kulkarni

काटामारी रोखण्यासाठी वजनकाटे उपलब्ध करावेत

Amit Kulkarni

केएलई म्युझिकतर्फे पारंपरिक भजन स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

स्पर्धेसाठी निवड झालेल्या फुटबॉलपटूंचा सत्कार

Amit Kulkarni

मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सच्या 24 व्या शोरूमचा शुभारंभ

Patil_p
error: Content is protected !!