Tarun Bharat

ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्तांना लसीकरण सुरू

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

जिह्यात 1 मार्चपासून कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिक तसेच 45 वर्षावरील कोमॉर्बीड (व्याधीग्रस्त) नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस घेतांना नागरिकांनी रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. याबरोबरच दहावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्यासाठी कोरोनापासून सुरक्षेच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री रूग्ण पॉझिटिव्ह आले असून 42 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. 

45 वर्षावरील ते 59 वर्षे वयोगटातील कोमोर्बीड (हृदयरोग, मधुमेह, दुर्धर आजार ) असणाऱ्या व्यक्तींना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीसाठी नागरिकांनी  https://selfregistration.cowin.gov.in  या लिंकचा वापर करुन आपल्या नावाची नोंदणी करावी. ज्या व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही, त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरण सत्राच्या ठिकाणी भेट देऊन नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

शासकीय रूग्णालयांत मोफत तर खासगी रूग्णालयांत शुल्क

सद्यस्थितीमध्ये 39 शासकीय व 10 खासगी आरोग्य संस्थेत लसीकरण करण्यात येत आहे. जिह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा, उपजिल्हा रुग्णालय कराड व फलटण. ग्रामीण रुग्णालय, पाटण, ढेबेवाडी, कोरेगाव, दहिवडी, खंडाळा, वडूज, महाबळेश्वर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड, चिंचणेर वं., नागठाणे, कण्हेर, काले, उंब्रज, पुसेगांव, पाचगणी, अहिरे, बावधन, कवठे, कुडाळ, तारळे, मळमावले, मायणी, पुसेसावळी, मार्डी, मलवडी, राजाळे, साख्रवाडी, वाठारस्एशन, रहिमतपूर तसेच नागरी आरोग्य केंद्र गोडोली, पुज्य कस्तुरबा फलटण या शासकीय रुग्णलयांमध्ये ( सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत ) कोविड-19 चे लसीकरण मोफत देण्यात येणार आहे. 

नोंदणीकृत खासगी आरोग्य संस्था ओन्को लाईफ क्लिनिक तामाजाईनगर सातारा, संजीवन हॉस्पिटल सातारा, कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय, कराड, सह्याद्री हॉस्पीटल कराड, शारदा हॉस्पीटल कराड, गुजर मेमोरियल हॉस्पिटल कराड, मानसी मेमोरियल हॉस्पिटल खंडाळा, पाटील हॉस्पिटल कोरेगाव, मंगलमूर्ती क्लिनिक सातारा, घोटवडेकर हॉस्पिटल वाई या ठिकाणी रुपये 250 प्रती डोस प्रमाणे शुल्क घेऊन लस देण्यात येणार आहे.

गर्दी टाळण्यासाठी नोंदणी करा

लस घेतांना नागरिकांनी आधी आपले रजिस्ट्रेशन करावे. लस घेताना नागरिकांची रुग्णालयात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑन लाईन रजिस्ट्रेशन करावे. जिह्यात असणाऱया लोक सेवा केंद्रामध्येही रजिस्ट्रेशन करता येईल. येथे नागरिकांना केवळ पाच रुपये शुल्क आकारुन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तसेच मोबाईल ऍपवरुनही  नोंदणी करता येईल. 45  वर्षावरील व्याधी  असणाऱया नागरिकांनी कोविड वेबसाईटवरील आजारांची  यादी तपासून घ्यावी. लवकरच खाजगी रुग्णालयांत देखील लस उपलब्ध होणार असून त्याची किंमत 250 रूपये इतकी राहील, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

जिल्हÎात सद्यस्थितीत पॉझिटिव्ही सरासरी 7 ते 11 टक्क्यांच्या दरम्यान आहे. कोविडच्या गेल्या वर्षाभराचा अनुभव पाहता लहान मुले व महाविद्यालयीन तरूणांमध्ये त्याचा कमी प्रमाणात संसर्ग आहे. मात्र शाळेत एखाद्या मुलाला संसर्ग झाला तर ते घरी गेल्यानंतर त्याच्या संपर्कातील ज्येष्ठ नागरिक, वृद्ध लोकांना संसर्ग होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी जिल्हÎात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दहावी, बारावी व विद्यापीठ परीक्षा ध्यानात घेऊन दहावी व महाविद्यालये सुरू ठेवली आहेत. मात्र कोरोनापासून बचावाच्या मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.

उपसंचालक घेणार कोविडचा आढावा

आरोग्य सेवा मंडळ, पुणेचे नवनियुक्त उपसंचालक, डॉ. संजोग कदम हे 5 व 6 मार्च रोजी सातारा जिह्यातील आरोग्य विषयक उपक्रमांचा आढावा घेणार आहेत. यामध्ये जिह्यातील कोविड-19 ची सद्यस्थिती, कोविड लसीकरण, सन 2020-21 साठी प्राप्त अनुदान व खर्च तसेच रुग्णालयीन व प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाबाबतचा ते आढावा घेणार आहे.  

42 नागरिकांना दिला डिस्चार्ज

जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 42 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीने 56 हजाराकडे वाटचाल सुरू केली आहे.

जिह्यात 2 बाधितांचा मृत्यू

गेल्या चोवीस तासात स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे दिडवाघवाडी येथील 50 वर्षीय महिला व जिह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये दहिवडी (ता. माण) येथील 74 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

390 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 35, कराड येथील 105, फलटण येथील 5, कोरेगाव येथील 33, वाई येथील 49, खंडाळा येथील 2, रायगाव येथील 28, पानमळेवाडी येथील 35, महाबळेश्वर येथील 30,  म्हसवड येथील 14 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 54 असे एकुण 396 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

गुरूवारी जिल्ह्यात

एकुण बाधित
एकुण मुक्त 42
एकुण बळी  02
गुरूवारपर्यंत जिल्हÎात
एकुण नमुने -350400
एकुण बाधित -59268  
घरी सोडलेले -55951  
मृत्यू -1859 
उपचारार्थ रुग्ण-1458

Related Stories

ऊस दर जाहीर न करताच गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा

datta jadhav

सातारा जिल्ह्याला पुन्हा झटका, 28 अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

वाईतील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू

Patil_p

निवड चाचणी ठरणार महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीम!

datta jadhav

मास असोसिएशनकडून कैलास स्मशानभूमीस दोन अग्निकुंड भेट

Patil_p

सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तुंची कल्पनाराजेंनी केली पाहणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!