मुंबई \ ऑनलाईन टीम
ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचं निधन झालं आहे. ते ६५ वर्षांचे होते. पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी मध्यरात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली.
जयंत पवार यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे आणि मुलगा असा परिवार आहे. जयंत पवार यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२.३० वाजता बोरिवलीतील दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
जयंत पवार यांनी लिहिलेली नाटके खूप गाजली. त्यांनी आपल्या नाटकांनी तसेच कथांनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला होता. पवार यांचा ‘फीनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.


next post