Tarun Bharat

ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे सोमवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुतणे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकरपंत यांना कोरोनाची लागण झाली होती. पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधाकरपंत परिचारक यांचे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मोठे नाव होते. सुधाकरपंत परिचारक यांनी सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांनी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. सुधाकरपंत परिचारक यांनी 2019 मध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.


सुधाकरपंत परिचारक हे दहा वर्ष राष्ट्रवादीचे आमदार होते. 2009 मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीरही झाली होती. गेल्या दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले. 2014 च्या निवडणुकीपासून परिचारकांनी राष्ट्रवादीसोबतही काडीमोड घेतला. मात्र गेल्या वर्षी सुधाकरपंतांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली.


सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. भाजपने तिकीट न दिल्यास अपक्ष लढा, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, मात्र भाजपने त्यांना तिकीट दिल्याने सुधाकरपंत रिंगणात उतरले. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला. 

Related Stories

बोगस शपथपत्राप्रकरणी ठाकरेंना दिलासा; क्राईम ब्रँचने केला महत्वाचा खुलासा

datta jadhav

सरकारी कामात अडथळा; आरोपीस कारावास

Abhijeet Khandekar

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी तात्काळ तपास करा; सुशांतच्या बहिणीची पंतप्रधानांना साद

Tousif Mujawar

बिडी कॉलनीत दुषित पाणीपुरवठा; महापालिकेचे दुर्लक्ष

Abhijeet Khandekar

राष्ट्रपती कोविंद पुन्हा UP दौऱ्यावर; अयोध्येत रामललाचे घेणार दर्शन

Archana Banage

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 2 लाख 70 हजारांवर

datta jadhav
error: Content is protected !!