Tarun Bharat

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


पत्रकारितेतील एक मोठं नाव तसेच पत्रकारितेतील लोकशाही मूल्य जपणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे मंगळवारी सकाळी 11 वाजता दादर येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. याआधी 16 मे रोजी त्यांचा पत्नीचे निधन झाले होते. 


दिनू रणदिवे यांचा जन्म डहाणूतील आदिवासीबहुल भागात 1925 मध्ये झाला होता. रणदिवे यांनी पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. 1955 मध्ये समाजवादी पक्षाने छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी 1956 साली पत्रकारितेला सुरूवात केली. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रणदिवे रूजू झाले व महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. 


1972 मध्ये रणदिवेंनी केलेले बांग्लादेश मुक्तिलढ्याचे वार्तांकनही गाजले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे. ते सेबिस्टियन डिसोझा मुंबई मिररमध्ये फोटो एडिटर होते. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यावेळी त्यांनी धाडसाने छायाचित्रण करून पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते, जो या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा ठरला. तसेच 2002 मध्ये गुजरात दंगलीचे वास्तव देखील त्यांनी माध्यमांमध्ये आणले होते. 

Related Stories

दादागिरी खपवून घेणार नाही; माझ्या पक्षाचे कार्यकर्ते शिंदेंच्या पाठीशी

datta jadhav

वेबसीरिज पाहून ICICI बॅंकेत डल्ला मारणाऱ्या तरूणाला कोल्हापुरात अटक

Archana Banage

पाथरी – शिर्डीच्या वादात आता बीडकरांची उडी

prashant_c

CM एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात करमाळा तालुक्यात पक्षबांधणीला सुरुवात; महिला आघाडीला मिळणार संधी

Abhijeet Khandekar

पदभार स्वीकारताच नारायण राणेंची मुख्यमंत्री आणि संजय राऊतांवर टीका

Archana Banage

पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत- कंगना राणावत

Archana Banage
error: Content is protected !!