Tarun Bharat

ज्येष्ठ विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे निधन

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


ज्येष्ठ विचारवंत, स्त्रीवादाच्या अभ्यासक प्रा. पुष्पा भावे यांचे शुक्रवारी रात्री 12.30 वाजता निधन झाले. त्या 81 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने विचारवंतांच्या फळीतील मोठा दुवा निखळला आहे.

 
पुष्पा भावे यांनी मराठी व संस्कृत घेऊन एम.ए ही पदवी घेतली. त्यानंतर मुंबईच्या विविध महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. समाजाच्या विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करणाऱ्या पुष्पाताई राष्ट्रसेवा दल, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन यामध्ये सक्रिय सहभागी झाल्या होत्या. अहिल्या रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्या समवेत त्यांनी लाटणे मोर्चा मध्येही भाग घेतला. हमाल, रिक्षावाले, असंघटित कामगार यांच्यासाठी बाबा आढाव यांच्याबरोबर त्यांनी काम केले. 


मराठवाडा विद्यापीठ नामांतर मंडल आयोग अशा विविध आंदोलनात त्या अग्रेसर राहिल्या. साने गुरुजी स्मारक निधी भारत पाकिस्तान पीपल्स फोरम फार पीस, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मेहेर संस्था अशा अनेक संस्थांमध्ये त्या सक्रिय होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

error: Content is protected !!