Tarun Bharat

‘झंकार’ भित्तीपत्रकाचे उद्घाटन

प्रतिनिधी / बेळगाव

विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी न होता आपल्यातील सुप्त गुण विकसित करणे फार महत्त्वाचे आहे, असे उद्गार राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अचला देसाई यांनी काढले. त्या भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षातील जिमखाना झंकार भित्तीपत्रक आणि इतर उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेतील साहित्य वाचून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील होते. त्यांनी आपल्या भाषणात, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वेगवेगळय़ा उपक्रमात सहभागी व्हावे, असे सांगितले. प्रास्ताविक आणि स्वागत जिमखाना चेअरमन डॉ. मीना मोहिते यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधींच्या नावाचे वाचन प्रा. शुभम चव्हाण यांनी केले. पाहुण्यांची ओळख वीणा पाटील हिने करून दिली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. प्राचार्या डॉ. अचला देसाई यांच्या हस्ते झंकार भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. झंकार भित्तीपत्रकामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी व कन्नड भाषेतील विद्यार्थ्यांचे साहित्य हस्तलिखितामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. जनरल सेपेटरी सतीश चव्हाण यांने आभार मानले. सूत्रसंचालन रमेजा मुल्ला व श्रीनिधी अप्पुगोळ यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

पुतळा उभारण्यावरून पिरनवाडीत तणाव, सौम्य लाठीमार

Tousif Mujawar

कायमस्वरुपी पीडीओ नेमण्याची कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांची मागणी

Omkar B

शिवसेनेतर्फे वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

Patil_p

पहिली लस घेतलेल्यांनाच दुसरा डोस देण्यास प्राधान्य

Amit Kulkarni

खडेबाजार मार्ग सर्वाधिक महागडा

Omkar B

ऐनापुरातील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग

Omkar B