Tarun Bharat

झगडणाऱया मुंबईसमोर आज बलाढय़ राजस्थानचे आव्हान

सूर्यकुमार यादव संघात परतल्याने मुंबईला काही प्रमाणात दिलासा

नवी मुंबई / वृत्तसंस्था

मधल्या फळीतील भक्कम आधारस्तंभ सूर्यकुमार यादव संघात परतत असल्याने दिलासा लाभलेला मुंबई इंडियन्सचा संघ आज (शनिवार दि. 2) होणाऱया आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुसंडी मारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. दोन्ही संघ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आमनेसामने भिडत आहेत. या लढतीला दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होईल.

पाचवेळचे चॅम्पियन्स मुंबई इंडियन्सला यापूर्वी यंदाच्या आयपीएल सलामी लढतीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 177 धावांचा डोंगर रचल्यानंतरही 4 गडय़ांनी पराभवाला सामोरे जावे लागले तर दुसरीकडे, राजस्थानने सनरायजर्स हैदराबादचा 61 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवला होता.

यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा ट्रेंड सुरु झाला आहे आणि यापुढेही बऱयाच प्रमाणात हाच ट्रेंड कायम राहील, अशी चिन्हे आहेत. मुंबईकडे, कर्णधार रोहित शर्मा व इशान किशन असे धडाकेबाज सलामीवीर उपलब्ध असून इशानने दिल्लीविरुद्ध नाबाद 81 धावांची खेळी साकारत आपली उपयुक्तता अधोरेखित केली.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तंदुरुस्ती प्राप्त केल्यानंतर सूर्यकुमार यादव संघात दाखल झाला असून येथे तो तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरणे अपेक्षित आहे. अगदी कोणत्याही स्थानी फलंदाजीला उतरला तरी सामना जिंकून देणारी खेळी साकारण्याचे त्याचे निर्विवाद कौशल्य कोणत्याही क्षणी मोलाचे ठरु शकते. यापूर्वी, दिल्लीविरुद्ध मुंबईची मधली फळी सपशेल अपयशी ठरली होती आणि त्या पार्श्वभूमीवर, आजच्या लढतीत सूर्यकुमार यादव संघात परतत असताना अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा व टिम डेव्हिड यांच्यापैकी एकाला बाहेर व्हावे लागेल, हे जवळपास निश्चित आहे.

जागतिक स्तरावरील कितीही दिग्गज गोलंदाजांवर तुटून पडत, षटकारांची माळ लावू शकणारा विस्फोटक अष्टपैलू केरॉन पोलार्ड यापूर्वी दिल्लीविरुद्ध अपयशी ठरला होता. तो देखील या अपयशाची भरपाई करण्यासाठी उत्सुक असेल. आज राजस्थानविरुद्ध लढतीत त्याला सूर सापडला तर ही मुंबईसाठी आणखी एक जमेची बाजू ठरु शकते.

मुंबईला गोलंदाजीतही अधिक चिंता

यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 177 धावांचे संरक्षण करता न आलेल्या मुंबईच्या गोलंदाजांची आज बलाढय़ राजस्थानविरुद्ध खरी कसोटी लागू शकते. राजस्थानची फलंदाजी लाईनअप पॉवर-पॅक आहे आणि त्यांना रोखण्याची जबाबदारी मुख्यत्वेकरुन जसप्रित बुमराहच्या खांद्यावर असेल. बसिल थम्पी व डॅनिएल सॅम्स यांची त्याला योग्य साथ लाभणे महत्त्वाचे ठरु शकते. याशिवाय, मुंबईकडून पदार्पणात 2 बळी घेणाऱया मुरुगन अश्विनला आणखी ब्रेकथ्रू मिळणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बसिल थम्पी, ऋतिक शोकिन, जसप्रित बुमराह, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, तिमल मिल्स, अर्शद खान, डॅनिएल सॅम्स, डेव्हाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, केरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल, इशान किशन.

राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, शुभम गरवाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, तेजस बरोका, अनुनय सिंग, केसी करिअप्पा,  जोस बटलर, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, नॅथन कोल्टर नाईल, जिम्मी नीशम, डॅरेल मिशेल, करुण नायर, ओबेद मकॉय, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल.

सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.

राजस्थान रॉयल्स मैदानात उतरणार ते वर्चस्व गाजवण्यासाठीच!

आयपीएलच्या या 15 व्या आवृत्तीत सर्वात तुल्यबळ संघ म्हणून राजस्थान रॉयल्सचा प्राधान्याने उल्लेख केला जातो आणि याचे श्रेय त्यांच्या मजबूत गोलंदाजी व फलंदाजी लाईनअपला जाते. या संघाला फक्त क्षेत्ररक्षणाच्या आघाडीवरच थोडय़ाफार चिंता आहेत.

यापूर्वी, सलामी लढतीत 55 धावांचे योगदान देणाऱया कर्णधार संजू सॅमसनकडून राजस्थानला येथील लढतीतही आणखी अपेक्षा असतील. यशस्वी जैस्वाल व जोस बटलर हे राजस्थानचे दोन्ही सलामीवीर हैदराबादविरुद्ध आश्वासक सुरुवात करण्यात यशस्वी ठरले होते. मात्र, याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्याचे कसब अधिक निर्णायक ठरु शकते. अन्य दोघे फलंदाज देवदत्त पडिक्कल व शिमरॉन हेतमेयर यांनीही उत्तम प्रारंभ केला आहे.

राजस्थानच्या जलद गोलंदाजीची मुख्य धुरा प्रसिद्ध कृष्णाकडे असून न्यूझीलंडचा यॉर्कर स्पेशालिस्ट ट्रेंट बोल्ट या संघात उपलब्ध आहे. शिवाय, रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहलसारखे अव्वल फिरकीपटू या संघात समाविष्ट आहेत. नॅथन कोल्टर-नाईल जखमी असल्याने त्याची जागा नवदीप सैनीसारख्या युवा खेळाडूला मिळू शकते.

आज मैदानात

आयपीएल ः 1) मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स

वेळ ः दु. 3.30 वाजता, स्थळ ः नवी मुंबई.

2) गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स

वेळ ः सायं.7.30 पासून, स्थळ ः पुणे

थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

ऑस्ट्रेलिया वि. पाक,

तिसरा वनडे (डे-नाईट) सामना

वेळ ः दु. 3.30 पासून

स्थळ ः लाहोर, थेट प्रक्षेपण ः सोनी सिक्स.

एफआयएच हॉकी

भारत वि. इंग्लंड

Related Stories

टी-20 मानांकनातील कोहलीचे स्थान स्थिर

Amit Kulkarni

भारत ऐतिहासिक विजयाच्या उंबरठय़ावर

Patil_p

मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक ताफ्यात जगदीश यांचा समावेश

Patil_p

फलंदाजीतील हाराकिरीचा भारताला फटका

Patil_p

मुंबईसाठी ‘जोर का झटका, धीरे से लगे’!

Patil_p

भारत-द. आफ्रिका महिलांच्या टी-20 मालिकेला आज प्रारंभ

Patil_p