Tarun Bharat

झगमगती दुबई

दुबई वुमन्स डे स्पेशल टूर बाय क्वेस्ट’,

अशी जाहिरात झळकली आणि मनात खूप दिवसांच्या सुप्त इच्छेने भरारी घेतली ती थेट 5 मार्च 2019 ला बेळगाव- दुबई टूर 43 महिलांसोबत प्रत्यक्षात उतरली.

बेळगाव ते मुंबई व मुंबई ते दुबई या प्रवासात आम्ही सर्वजणी आई-मुलगी, सासू- सून, नणंद- भावजय, आजी- मावशी, शेजारी व आमच्या स्नेहग्रुपच्या मैत्रिणी एकत्र आलो, महत्त्वाचा दुवा म्हणजे बेळगाव माहेर असणाऱया मैत्रिणी ठरवून या टूरला आल्या हेच मोठे आश्चर्य.

आमची टूर लिडर मिस मयुराने आपल्या सदाबहार हसमुख चेहऱयाने आमची सर्वाची मने जिंकली.

दुबई एअर पोर्टपासून जी स्वप्नवत नगरी आम्ही अनुभवली ती खूपच न्यारी. ऍटोमॅटिक मेट्रोमधून टर्मिनलला उतरताच प्रवासाचा शीण विसरुन गेलो. त्याच दिवशी संध्याकाळी ‘धो क्रूझ’वर तरंगत तनुरा डान्स, मॅजिक शो बघत तेथील स्थानिक भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत-घेत तेथील गार-गार हवेत हिंदी गाण्यांचा आनंद घेतला. दुसऱया दिवशी सकाळी दुबई सिटी टूरमध्ये, दुबई फ्रेमच्या 48 व्या मजल्यावर जाऊन, काचेवर चालत रोमांचक व थरारक अनुभव घेतला. म्युझियममधील अरब लोकांनी प्रतिकूल परिस्थिती कशा रितीने आपले जगात स्थान कसे निर्माण केले हे विचार करण्यास लावणारे आहे. यामध्ये  डेरा सिटी सेंटर, इंटरनेट सिटी, मेडिकल सिटी, नॉलेज-विलेज, पहात-पहात जुमेरा बीचवर पोहचलो. तेथील भव्य-दिव्य बुर्ज-अल-अरबचे नेत्रसुख घेऊन मोनोरेलने ‘पाम ऍटलांटीस’, जे समुद्रामध्ये भराव टाकून ‘पाम’ या झाडाच्या आकारात बसविलेले एक मोठे बेट, ते पाहण्यास गेलो. या बेटावर जगातील सर्वोत्तम बांधकाम स्थापत्यचे नमुने व सर्व सुविधा देऊन वसाहत व योग्य निवास स्थाने बांधण्यात आली आहेत. त्यासोबत सर्वांसाठी एक भले मोठे ‘ऍटलांटीस ऍक्वाव्हेंचर’ ज्यामध्ये पाण्यातील सर्व  क्रीडाखेळ  मनोरंजनासाठी ठेवलेले आहेत.

संध्याकाळी हॉटेलमध्ये ज्या इव्हेंटसाठी आम्ही उत्सुक होतो तो मंद-मंद संगीत व रोषणाईने सुरू झाला. इतकी वर्ष महिला दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्या व्यतिरिक्त काही करणे जमले नाही. पण आज तो दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला, तो क्वेस्टच्या कल्पकतेने. आम्ही सर्वजणी इतक्मया भारावून गेलो की, वातावरणातील आपल्या खास अस्तित्वाची जाणीव सुखद धक्का देऊन गेली. टूर मॅनेजर मीस मयुराने स्वहस्ते सर्वांना ‘क्वेस्ट क्वीन’चा किताब देऊन प्रसन्न केले. जणू असे वाटले की आज मी खरी क्वीन आहे. हर्षवायू म्हणजे काय याची प्रचिती मला त्या दिवशी झाली. अखंड बडबड, फोटो, गाणी, आवडी- निवडी जपताना जो जोश होता, तो अविस्मरणीय. त्याची तुलना व बरोबरी नाहीच नाही. त्यातच रत्नागिरीहून आलेल्या एका लेखिकेचा 61 वा वाढदिवस साजरा करताना सर्वजणी केक कापत बालपणीच्या आठवणीत चिंब-चिंब झालो. जेवणाचा सर्वांनाच विसर पडला होता. प्रत्येकजणीला प्रत्येकाबरोबर फोटोज पाहिजे होते त्यात इतकी धमाल झाली की वेळ कसा संपला ते समजलेच नाही.

या टूरमध्ये अंतिम दिनी अनेक पर्याय उपलब्ध होते, जे प्रत्येकाला स्वत:च्या वयोमानानुसार व आवडीनुसार ठरवायचे होते. जसे की Fishing and Cruising, Dubai- Dolphinorium, Water- Sports, Activities, Helicopter Tour, Seaplane- Tour इत्यादी इत्यादी.

यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे शॉपिंग, ज्यासाठी शेवटचा दिवस ठेवला होता. मीना बाजार, मसाला बाजार, गोल्ड बाजार, इत्यादी आवडीनुसार ग्रुप ठरवून सर्वजणींनी मनसोक्त खरेदी केली. सोन्याच्या दुकानात आपल्याकडे केवढी सिक्मयुरीटी वगैरे असते पण तिथे तसे काही नाही. फक्त कॅमेराची नजर मात्र सर्व दुबईत तुमच्यावर असणार हे नक्की. कुठेही पोलीस दिसत नाहीत. तरीही व्यवहार शिस्तबद्ध, वाहतूक नियोजन एकदम नियंत्रित आहे. कुणीही पादचारी दिसला की गाडी लांबवर थांबणार, कुठेही  रोड क्रॉसिंग व सिग्नलची घाई नाही. सर्व नियम अगदी काटेकोरपणे. स्वच्छ रस्ते, गाडय़ा व ड्रायव्हरसुद्धा स्वच्छ. खरोखरच शेवटी असे वाटते की या माणसांनी किती प्रतिकूल परिस्थितीत ही शिस्त बाळगत हा स्वर्ग निर्माण केला असेल याची दाद द्यावीशी वाटते.

Dubai Marina Mall Of Emirates मध्ये जवळजवळ 1300 स्टोअर्स असून त्यामध्ये जगातील सर्व ब्रँण्डेड उत्पादने, चॉकलेटस् व इतर वस्तू आकर्षित करतात. तर तेथील विद्युत रोषणाई व स्वागतोत्सुक स्टाफ पाहून खरंच खूपच अपूर्वाई वाटली. त्यांचे शिष्टाचार, शिस्त व माहिती देणारी टीम या सर्वांचे अभिनंदन करण्यायोग्य आहे. त्याच ठिकाणी आम्ही अंडरवॉटर ऍक्मवेरियमचा थरारक अनुभव घेतला. त्याचे पॅनेल हे Largest Viewing Panel On Earthअसा उल्लेख आहे.

अंडरवॉटर झू मध्ये जवळ जवळ 33,000 Aquotic Animals Including Tiger Sharks And Stingrays. लहानपणी परिकथेतील चित्रातले प्राणी प्रत्यक्ष पहाण्याचा जो आनंद झाला, तो गगनात मावणारा नव्हता. ऍक्वेरियम मधील पाणी स्वच्छ व सुंदर, नितळ जणू काही सर्व आरपार दिसत होते.

त्याच मॉलमधून बुर्ज-ए खलिफाच्या 124 व्या मजल्यावर 60 सेकंदामध्ये कसे पोहोचलो ते समजलेच नाही. जणू काही अलगद मोरपिसावरून हलकेच सरकल्यासारखे वाटले. वरून फोटोग्राफी करताना कारंजे व रोषणाईचा शो सारा परिसर उजळून टाकतो. ही रोषणाई रात्रभर सुरू असल्याने ती आपण अवती-भवती फिरताना लांबवर आपल्याला कायम दिसत असते.

सकाळी मिरॅकल गार्डन पाहून वाटले की खरोखरच हे नाव किती सार्थक आहे. वाळवंटात तिथे फक्त वाळूशिवाय काही नसताना त्या ठिकाणी नितांत सुंदर फुलांचे नमुने, त्यांची रचना बघून मन अचंबित झाले. झाडांची, फुलांची वेगवेगळय़ा आकारात केलेली रचना, त्यांचा जिवंतपणा, टवटवीतपणा आपली तहान भूक विसरायला लावते. बागेतील वातावरण निर्मिती तर कौतुकास्पदच. कितीही फोटो झाले तरी प्रत्येक फुलांसोबत, झाडासोबत फोटो घेण्याचा मोह आवरत नाही. एवढय़ा प्रतिकूल हवामानामध्ये बाग फुलवणे ही एका परिकथेतल्या परिच्या जादूप्रमाणेच भासते.

सकाळी खास शॉपिंगसाठी तेथील सर्व मार्केटस् अगदी मनसोक्त फिरून तेथील चॉकलेटस्, खजूर, मसाले यांची खरेदी केली. तेथील सोन्याच्या दागिन्यांचे विविध प्रकार पाहून काय घेऊ अन् काय नको असे वाटले. शेवटी मोहाला आवरत घेत आम्ही सर्वजणी संध्याकाळच्या  Desert Dune Safari च्या तयारीला लागलो.

Desert Safari साठी ज्या गाडय़ा आल्या होत्या. त्यामध्ये हमर, निसान पेट्रोल, सफारी व महिंद्रा अशा सात चकचकीत गाडय़ांचा ताफा आला. तेव्हा आपण कुठल्या गाडीत बसावे हा यक्षप्रश्न सर्वांनाच पडला आणि हॉटेलपासूनच सफारीचा जल्लोष सुरू झाला. वाळवंटातून गाडय़ांचा ताफा जसजसा पुढे जाऊ लागला, तसतसे अनेक चित्तथरारक स्टंट्स अनुभवताना अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले. वेडीवाकडी, उभी-आडवी वळणे सहजपणे पार पाडत जाताना त्यांचे कौशल्य बघून खरोखरच कौतुक वाटले. यामध्ये कोणालाही कुठलाच त्रास वगैरे झाला नाही. मध्येच उतरून त्या मऊशार वाळुत फोटोग्राफी, उंट सवारी, बाज पक्षाबरोबर फोटो, बग्गी चालवणे इत्यादी गोष्टी मनमुरादपणे अनुभवल्या.

नंतर रात्री त्यांच्या कॅम्पमध्ये फायर शो, तनुरा डान्स, व प्रसिद्ध बेली डान्स पाहत डिनर संपवून रात्री हॉटेलवर पोहोचलो. अशा तऱहेने 5 दिवसाची स्वप्नवत दुबईची टूर कशी संपली हे कुणालाच कळले नाही.

शेवटी या रम्य सफरीचा अखेरचा दिवस उगवला. नकोशा वाटणाऱया परतीच्या चर्चा सुरू झाल्या. स्वप्नवत वाटणारी ही टूर एक अनामिक हुरहूर लावत संपत आली. पूर्णपणे महिला सहप्रवाशांसोबत अधिक मुक्तपणे घालविलेले हे मौजमजेचे चार दिवस पुनर्प्रत्ययाला येतील का? असे मनाशी येताच लक्षात आले की हे सहजशक्मय आहे. क्वेस्ट टूर्सच्या विलक्षण आनंद देणाऱया अशा टूर्स नियमितपणे आयोजित होतात. खुद्द बेळगावातून परत बेळगावपर्यंत. सौंदर्यस्थळांना भेटी, निवास व्यवस्था, वैयक्तिक लक्ष व सुरक्षितता सारे कसे बिनधास्त अशा परिपूर्णतेने आयोजिलेल्या या सहलींचे दरवषीचे आयोजन मनात दिलासा देऊन गेले.

यावषी क्वेस्टतर्फे मार्च 2020 मध्ये दुबई व थायलंड, मलेशिया  येथे केवळ महिलांसाठीच असणाऱया टूर्समधून ही आनंद पर्वणी साधण्याचा मनोदय बऱयाच जणींनी व्यक्त केला व त्यासाठी एकमेकींच्या संपर्कात रहायचे तसेच नवे सहप्रवाशीही निर्माण करायचे ठरवून आम्ही जड पावलांनी परंतु तृप्त मनाने एकमेकींचा निरोप घेतला.

क्वेस्ट टुर्स- संपर्क- अभिषेक बांदिवडेकर 991660525

 

Related Stories

देखभाल कराराचे महत्त्व

Patil_p

गृहकर्ज थकलं…काळजी नको….

Patil_p

जुन्या कार्पेटच करायचं काय?

Patil_p

जम्मू-काश्मीरमधील रिअल इस्टेटची स्थिती

Patil_p

मल्लू

Patil_p

पूनर्विक्रीतल्या घरांचा पर्याय

Patil_p