Tarun Bharat

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा पूल आणि मोबाईल टॉवर उडवला

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बराकर नदीवरचा एक मोठा पूल आणि एक मोबाइल टॉवर काल मध्यरात्री बॉम्बने उडवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरिडीह जिल्ह्यातल्या डुमरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा हा पूल मध्यरात्री २ ते २.३० वाजताच्या दरम्यान उडवण्यात आला. या स्फोटानंतर पुलाची एक बाजू पूर्णतः उध्वस्त झाली आहे. त्यामुळे या भागातली वाहतूकही खोळंबली आहे. टीव्ही ९ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून परतण्यापूर्वी तिथे एक चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. त्यात लिहिलं आहे की अटक करण्यात आलेला नक्षलवादी प्रशांत बोस आणि त्यांच्या पत्नीला चांगली वैद्यकीय सेवा देण्याचे आणि २१ ते २६ जानेवारी दरम्यान होणारा प्रतिकार मोर्चा यशस्वी करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

या स्फोटानंतर पुलाची एक बाजू पूर्णतः उध्वस्त झाली आहे. त्यामुळे या भागातली वाहतूकही खोळंबली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून परतण्यापूर्वी तिथे एक चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. त्यात लिहिलं आहे की अटक करण्यात आलेला नक्षलवादी प्रशांत बोस आणि त्यांच्या पत्नीला चांगली वैद्यकीय सेवा देण्याचे आणि २१ ते २६ जानेवारी दरम्यान होणारा प्रतिकार मोर्चा यशस्वी करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

गिरिहीड जिल्ह्यातली ही पहिलीच घटना नाही. या परिसरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून नक्षलवाद्यांची दहशत वाढली आहे. या आधी हे नक्षलवादी पीरटांड, डुमरी, भेलवाघाटी अशा दूरच्या भागांमध्ये हल्ले करत होते. मात्र आता ते गिरिडीह मधल्या प्रमुख जागांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Related Stories

मणिपूरमध्ये आज मतदानाचा पहिला टप्पा

Patil_p

राज्यभर पाऊस पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचे संकेत

Abhijeet Shinde

”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी”

Abhijeet Shinde

धक्कादायक! वृध्द महिलेस बँक म्हणाली.. तुमचा तर मृत्यू झालाय, पैसे कसे देऊ?

prashant_c

सातारा हाफ हिल मॅरेथॉन मध्ये धावताना कोल्हापुरातील तरुणाचा मृत्यू

Archana Banage

BMC चा मोठा निर्णय; पहिली ते चौथीचे वर्ग बंदच राहणार

datta jadhav
error: Content is protected !!