Tarun Bharat

झिंबाब्वे मालिकेसाठी पाक संघ घोषित

Advertisements

वृत्तसंस्था/ कराची

पुढील महिन्यात यजमान पाकिस्तान आणि झिंबाब्वे यांच्यात वनडे आणि 20-20 मालिका खेळविल्या जाणार असून या मालिकांसाठी सोमवारी पीसीबीने 22 जणांचा संभाव्य संघ घोषित केला. या संघामध्य नवोदित फलंदाज अब्दुल्ला शफीकला संधी देण्यात आली असून अनुभवी आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सर्फराज अहमद, शोएब मलिक आणि मोहम्मद आमीर यांना वगळण्यात आले आहे.

पाकमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टी-20 चषक क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल पंजाब संघाकडून खेळताना सियालकोटचा 20 वर्षीय अब्दुल्ला शफीकने दर्जेदार कामगिरी केली होती. यामुळे त्याला राष्ट्रीय संघात निवड समितीने स्थान दिले आहे. राष्ट्रीय टी-20 चषक स्पर्धेत शफीकने 358 धावा जमविल्या असून त्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. प्रथमश्रेणी आणि टी-20 प्रकारात पदार्पणात शतक झळकविणारा अब्दुल्ला शफीक हा दुसरा क्रिकेटपटू आहे.

झिंबाब्वे आणि पाक यांच्यात पहिल्यांदा तीन वनडे सामने अनुक्रमे 30 ऑक्टोबर, 1 व 3 नोव्हेंबर रोजी रावळपिंडीतील क्रिकेट स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. त्यानंतर लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर उभय संघात तीन टी-20 सामने अनुक्रमे 7, 8 आणि 10 नोव्हेंबरला होणार आहेत.

पाक संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान (उपकर्णधार), हैदर अली, अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, हॅरीस सोहेल, अबीद अली, फक्र झमान, मोहम्मद हाफीज, खुशदिल शहा, मोहम्मद रिझवान, इफ्तिकार अहमद, फहिम अर्श्रफ, इमाद वासिम, रोहेल नझीर, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद हेसनेन, हॅरीस रॉफ, मुसा खान, वहाब रियाज, उस्मान कादर आणि झफर गोहर.

Related Stories

प्ले-ऑफसाठी पात्रतेचा रबाडाला विश्वास

Patil_p

सायना, लक्ष्य सेन, प्रणॉय दुसऱया फेरीत

Patil_p

‘टी-20’ सामन्यात पंतच्या नेतृत्वाची ‘कसोटी’

Patil_p

ऍशेस मालिकेतील शेवटची कसोटी आजपासून

Amit Kulkarni

भारतीय महिलांचा अमेरिकेवर विजय

Patil_p

भारत-डेन्मार्क डेव्हिस चषक लढत उद्यापासून दिल्लीत

Patil_p
error: Content is protected !!