Tarun Bharat

‘झिम्मा’चा खेळ रंगणार 19 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात

Advertisements

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले होते. या धमाकेदार टीझरने चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवून ठेवली होती. मात्र महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. परंतु आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर असून‘झिम्मा ’चा खेळ आता लवकरच रंगणार आहे, ‘झिम्मा’ 19 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा ‘झिम्मा’ हा पहिला मराठी चित्रपट आहे.

 वेगवेगळय़ा पार्श्वभूमी, व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रिया जेव्हा आपल्या सर्व जबाबदाऱया बाजूला ठेवून आपले आयुष्य मनमुराद जगण्यासाठी एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, ती यात दाखवण्यात आली आहे. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींसोबत सिद्धार्थ चांदेकरही दिसणार आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स निर्मित ‘झिम्मा’या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून अमितराज यांचे  संगीत लाभले आहे.  छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Related Stories

अमृता खानविलकर देतेय योगाचे धडे

Patil_p

मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलं तर… मनसेचा कंगनाला इशारा

Rohan_P

‘इतिहासाच्या योग्य बाजूने उभे राहा’, सोनम कपूरचा देशवासीयांना सल्ला

tarunbharat

अजय देवगण यांच्याकडून ‘पॅनोरमा म्युझिक’चा श्रीगणेशा

Patil_p

कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Rohan_P

ज्येष्ठ अभिनेते – निर्माते महेश मांजरेकर यांची कॅन्सरवर मात!

Rohan_P
error: Content is protected !!