एकेकाळी बॉलिवूडवर ब्युटी क्वीन झीनत अमात यांनी राज्य केले होते. झीनत यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे सौंदर्य, बोल्डनेस आणि फॅशनद्वारे नायिकांचा एक नवा ट्रेंड चालविला होता. आजदेखील झीनत अमान यांच्या चित्रपटांमधील स्टाइल स्टेटमेंटला अत्यंत पसंत केले जाते. झीनत अमान आता 69 वर्षांच्या झाल्या असून बॉलिवूडमध्ये त्यांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.


चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमान यांनी सहकाऱयांसोबत मिळून केक कापला आहे. या जल्लोषादरम्यान झीनत यांच्या मित्रांनी कुर्बानी चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘लैला ओ लैला’ लावल्यावर झीनत यांनी केलेले नृत्य पाहण्याजोगे होते. आजही झीनत यांच्या या अदांवर चाहते घायाळ होत असून या चित्रफितीला पसंत करत आहेत.
झीनत यांनी 1970 मध्ये मिस इंडिया आणि त्यानंतर मिस एशिया पॅसिफिक ही स्पर्धा जिंकली होती. 1971 मध्ये झीनत यांचे हलचल, हरे कृष्णा हरे राम आणि हंगामा हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. स्वतःच्या कारकीर्दीत त्यांनी यादों की बारात, हीरा पन्ना, रोटी कपडा और मकान, धरम वीर, सत्यम शिवम सुंदरम, डॉन, कुर्बानी, दोस्ताना, प्रोफेसर प्यारेलाल, लावारिस, पुकार यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.