Tarun Bharat

झेडपीच्या पाणी पुरवठय़ात सामाजिक संस्थांचे प्रेझेंटेशन

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्यात जलजीवन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाच्या समांतर सामाजिक संस्थांकडून गावोगावी काम करुन घेण्याकरता त्यांची निवड करण्यासाठी  नुकतेच त्यांचे प्रेझेंटेशन पाणी पुरवठा विभागात पार पडले. राज्य शासनाकडे हे प्रस्ताव जाणार आहेत. तेथून मंजूरी मिळणार आहे, असे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून गावोगावी जलजीवन योजना अधिक  प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य पातळीवरुन सामाजिक संस्थांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सातारा जिह्यातील 20 संस्थांनी आपले सादरीकरण केलेल्या कामाची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शिंदे यांच्याकडे सादर केले. दरम्यान, त्या सामाजिक संस्थांकडून नेमके काय काम झाले त्याची माहिती घेवून पुढे शासनाच्या पाणी पुरवठा विभागात पाठवण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.

Related Stories

Satara; स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवातही रुग्णांना घ्यावा लागतोय ‘ढालग्याच्या अ‍ॅम्ब्युलन्स’चा आधार

Abhijeet Khandekar

ऑस्ट्रेलियाच्या बार्टीची केनिनवर मात

Patil_p

जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्यभिषेक दिन शाही पद्धतीने साजरा

Patil_p

साताऱयाची लेक निघाली मिस इंडियाच्या स्पर्धेसाठी

Patil_p

उर्वरित केशरी शिधापत्रिका धारकांना मे पासून रेशन धान्य मिळणार : श्रीकांत शेटे

Archana Banage

जिल्ह्यात 1878 नवे बाधित

datta jadhav
error: Content is protected !!