Tarun Bharat

झेडपीत ओळखपत्र पाहूनच प्रवेश

Advertisements

हस्तांदोलन सुद्धा टाळण्याचा आदेशात उल्लेख

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत कडक नियम करण्यात आलेले आहेत. सर्व खातेप्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रागंणात जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्य यांच्या वाहनांना प्रवेश राहिल. अन्य वाहनांना मनाई करण्यात आला आहे. तसेच हस्तांदोलन टाळण्याबाबतचेही आदेशात उल्लेख आहे. कर्मचाऱयांसाठीही कडक नियमावली करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा परिषदेत कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंत्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाचे अभियंता अभय पेशवे आणि साळुंखे यांना तशा सुचना दिल्या गेल्या आहेत. त्यांनीही त्या परिपत्रकांनुसार अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामध्ये अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱयांना प्रवेश करणे व बाहेर जाण्यासाठी मुख्य इमारतीचा एकच दरवाजा चालू ठेवून इतर पर्यायी मार्ग बंद करण्यात यावेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये पदाधिकारी, सदस्य व अधिकारी, शासकीय कर्मचाऱयांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांस प्रवेश बंद करावा. तसेच संबंधितांचे आयकार्ड पाहूनच प्रवेश देण्यात यावा, जिल्हा परिषद मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी एकच गेट सुरु ठेवावे. येणाऱयांची थर्मल तपासणी करुन सॉनिटायझर देवूनच प्रवेश द्यावा. तसेच तक्रारी ऑनलाईन घ्याव्यात, शासकीय कार्यालयाचा परिसर स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यालयातील कर्मचाऱयांनी स्वच्छता पाळावी. वैयक्तिक सुनावणीस एखादी व्यक्ती गैरहजर राहिली म्हणून प्रकरणे, केस निकाली न काढता वैयक्तिक हजेरीमध्ये सुट देवून पुढील सुनावणीची तारीख देण्यात यावी, जिल्हा परिषदेतील सर्व सुरक्षा रक्षकांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश देण्यात येवू नये, ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.

Related Stories

आंतरराष्ट्रीय ‘मराठी मंचा’ची स्थापना

Nilkanth Sonar

चौपाटी सुरू पण ग्राहकांचा थंड प्रतिसाद

Patil_p

कोल्हापूर : हाळोलीत हत्तीचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ,पाच जण जखमी

Patil_p

बार्शीत मद्यपींचा दारू पिण्याचा परवाना काढण्याकडे कल

Abhijeet Shinde

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान अप्पालाल शेख यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!