Tarun Bharat

झेडपीत व्हीसी रुममध्ये पुरस्काराची रक्कम मुरवली

सीईओंकडून ‘अभय’ कोणाला?, दुरुस्तीच्या नावाखाली एका मजल्यावर एका केबीनची अद्यापही नादुरुस्तीच

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेत काही विभागात अंधाधुंदी सुरु आहे. ती वारंवार वादातित राहिली असून चर्चेत आली आहे. परंतु वरिष्ठांची मेहरबानी असेल तर कामे मग रेटून दामटून केली जातात. त्याचाच प्रत्यय जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वी गुपचुपमध्ये उद्घाटन झालेल्या व्हीसी रुमच्या उद्घाटनावरुन आला आहे. या रुमसाठी पुरस्काराची रुक्कम मुरवली असून त्या कामांचा ज्यांना ठेका दिला त्या ठेकेदारांकडून नॉन डीएसआर वस्तू खरेदी करुन त्या वस्तूचा वापर केला. दोन दिवसांपूर्वी या ठेकेदाराचे बील अदा केल्याची जोरदार जिल्हा परिषदेत चर्चा सुरु आहे. दरम्यान, एका विभागाचे केबीन आणि कार्यालय मजल्यावर होते. तेथे दुरुस्तीच्या नावाखाली अद्यापही नादुरुस्ती तशीच आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडून नेमके कोणला ‘अभय’ दिले जात आहे.

सातारा जिल्हा परिषदेत काही विभागामध्ये अनागोंदी सुरु आहे. अशा पद्धतीने एका विभागात जोमात काम सुरु आहे. सध्या कोणतेही काम ठेकेदारास द्यायचे असले तर त्याची निविदा प्रक्रिया काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येते. परंतु जिल्हा परिषदेत नुकत्याच उद्घाटन झालेल्या व्हीसी रुमच्या कामाची निविदा ही छोटय़ा छोटय़ा स्वरुपाची कामे दाखवत काढल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचा ठेका एका जवळच्या ठेकेदारास देण्यात आला. त्या ठेकेदारानेही मग आपलाच अधिकारी असल्याने कामही तशाच पद्धतीने केले गेले. यामध्ये वस्तूचा वापर हा नॉन डीएसआरने खरेदी केलेल्या वस्तू वापरल्या गेल्या आहेत. त्या वस्तूचे कोटेशन मात्र जास्त दराने दाखवून त्याची बिले वसुल करण्यात आली आहेत. काम झाले त्यास पंधरा ते एक महिना उटलून गेला आणि दोन दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराने बील काढल्याची जोरदार चर्चा आहे.  

पदाधिकाऱयांची चुप्पी

यापूर्वीही जिल्हा परिषदेत चुकीच्या कामावरुन मीडियाने लक्ष वेधले गेले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱयांनी सूचना दिल्या होत्या. परंतु प्रशासनातील अधिकाऱयांकडून कार्यवाही दिखावाच झाली. त्यामुळे याही प्रकरणामध्ये पदाधिकाऱयांकडून चुप्पी असून व्हीसी रुमची गरज होती असे काही पदाधिकाऱयांच्याकडून म्हणणे आले. त्यामुळे जिल्हा परिषदेत मुरवामुरवी सुरु आहे.

Related Stories

गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षातून एकदाच घ्यावी लागणार परवानगी

datta jadhav

जि. प. समुपदेशन केंद्राची 18 वर्षात यशस्वी वाटचाल

Patil_p

भाजप जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवणार

datta jadhav

कराडच्या छत्रपती संभाजी स्मारकास जिल्हाधिकाऱयांची मंजुरी

Patil_p

स्वाभिमान दिनी किल्ले अजिंक्यताऱ्यावर 2032 चा निर्धार

datta jadhav

अंत्यसंस्कारानंतर ‘त्या’ वृद्धाचा अहवाल निघाला पॉझिटिव्ह

Archana Banage