Tarun Bharat

झेडपी उमेदवारीसाठी आज ‘डेड लाईन’

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याचा आज गुरुवार दि. 5 मार्च हा शेवटचा दिवस असून काल बुधवारी एकूण 88 उमेदवारांनी अर्ज भरले. त्यात उत्तर गोव्यातील 42 तर दक्षिण गोव्यातील 46 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत मिळून एकूण 178 उमेदवारांचे अर्ज जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत. त्यात उत्तर गोव्यातील 96 तर दक्षिण गोव्यातील 82 उमेदवार समाविष्ट आहेत. 

शुक्रवारी 6 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 7 रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्या दिवशी 50 जिल्हा पंचायत मतदारसंघातून अंतिम लढती स्पष्ट होणार आहेत.

आतापर्यंत 6 मतदारसंघांमध्ये केवळ एकच अर्ज

आतापर्यंत उत्तर गोव्यातील हरमल मतदारसंघातून सर्वाधिक 8 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. एकूण 6 मतदारसंघातून आतापर्यंत एकच उमेदवाराचा अर्ज दाखल झाला असून आज शेवटच्या दिवशी तेथे कोणी अर्ज सादर केला नाही तर तेथील एकमेव उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. खोर्ली, केरी, कवळे, शिरोडा, पैंगीण, कुठ्ठाळी या मतदारसंघात एकमेव अर्ज आलेला आहे. गुरुवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांची एकूण संख्या 200 पेक्षा जास्त होणार असा अंदाज आहे.

गोवा फॉरवर्डची पाटी अद्याप कोरीच…

भाजप, मगोप, आप, काँग्रेस अशा विविध राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उतरवले आहेत. गोवा फॉरवर्ड या पक्षाचे उमेदवार मात्र दिसत नाहीत तर अपक्ष उमेदवारांचा भरणा मोठय़ा प्रमाणात आहे. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत 30 उमेदवारांची नावे जाहीर केली असून 7 उमेदवारांची नावे आज शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येतील, असा अंदाज आहे. भाजपने बहुतेक मतदारसंघातून उमेदवार दिले आहेत. अंतिम चित्र शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.   

भाजपविरोधात काँग्रेसची ‘काऊंटर गेम’स्वबळावर लढणार 37 जागा 

प्रथमच पक्षीय चिन्हावर निवडणूक लढविण्याऱया काँग्रेस पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीच्या 37 जागा लढविण्याचा तर उर्वरित जागांवर समविचारी घटकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत काँग्रेसचे 30 उमेदवार घोषित झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी भाजप विरोधात ‘काऊंटर गेम’ ची योजना आखली आहे.

उत्तर आणि दक्षिण गोव्यात सक्षम उमेदवार देण्यावर काँग्रसे पक्षाने भर दिला आहे. गटसमित्या, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन उमेदवार निश्चित करण्यावर काँग्रेसने भर दिला असून बंडखोरी होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी काँग्रेस भवनात बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या सूचना घेतल्या जात आहेत.

मगो उमेदवार, अपक्षांना सहकार्य

ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार उभे करणार नाही, अशा मतदारसंघांत काँग्रेस समविचारी व अपक्ष उमेदवारांना सहकार्य करणार आहे. मगो पक्षही काँग्रेसच्या सहकार्यासाठी प्रयत्नीशील असून काँग्रेस काही मतदारसंघात मगो उमेदवारांना सहकार्य करण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रमुख कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रमुख पदाधिकारीही कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतील.

भाजपला शह देण्यासाठी वेगळी रणनिताr

सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने विशेष रणनिती आखली आहे. काही महत्वाच्या मुद्दय़ांवर भर देऊन मतदारांना आकर्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. वैयक्तिक गाठीभेटीवर उमेदवारांचा भर रहाणार आहे. त्याचबरोबर ठराविक मतपेटीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. भाजपला दणका देण्यासाठी काँग्रेसने यावेळी पद्धतशीरपणे रणनिती आखली आहे.

फुटीरांना दणका देण्याची तयारी

काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून भाजपात प्रवेश केलेल्या फुटीर आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपात प्रवेश केलेल्या आमदारांना दणका देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. तिसवाडी तालुक्यातील मतदारसंघात काँग्रेसने विशेष रणनिती आखली आहे. चांगले उमेदवार देण्याबरोबरच उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत.

Related Stories

सांस्कृतिक नगरी बनली कार्निव्हलमय

Amit Kulkarni

पर्वरीत रेंट अ कार उलटली कारचे मोठे नुकसान : दोघे जखमी

Amit Kulkarni

लवकरच म्हादई बचाव मेराथॉन

Patil_p

दोन वर्षानंतर लोहिया मैदानावर क्रांती दिन कार्यक्रम

Amit Kulkarni

रेव्होल्यूशनरी गोवन्सचे शशीराज नाईक शिरोडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sumit Tambekar

कुडचडे येथे आज रक्तदान शिबिर

Amit Kulkarni
error: Content is protected !!