Tarun Bharat

झेन स्पोर्ट्स-जीजी बॉईज आज अंतिम लढत

Advertisements

श्री चषक ऑल इंडिया टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

श्री स्पोर्ट्स खडकगल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱया सामन्यात जी. जी. बॉईज संघाने विघ्नहर्ता अनगोळ संघाचा 37 धावानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सुनील व्ही. याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसऱया उपांत्य सामन्यात जी. जी. बॉईजने 10 षटकात 8 बाद 91 धावा केल्या. मनोज नार्वेकरने 1 षटकार 3 चौकारासह 34 तर अनंत एम.ने 18 धावा केल्या. विघ्नहर्ता अनगोळतर्फे गौरेश के. व दर्शन बी. यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विघ्नहर्ता अनगोळचा डाव 9 षटकात सर्व बाद 54 धावात आटोपला. सॅन्डी के.ने 2 षटकारासह 14 धावा केल्या. जी. जी. बॉईजतर्फे सुनील व्ही.ने 11 धावात 4, गोपाल गवसने 22 धावात 3, गौरेश एन.ने 13 धावात 2 गडी बाद केले. पावसामुळे अंतिम सामना रद्द करण्यात आला.

अंतिम सामना बुधवार दि. 6 रोजी सकाळी 10 वा. जी. जी. बॉईज विरूद्ध झेन स्पोर्ट्स यांच्यात होणार आहे. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विजय आचमनी, महेश आचमनी, विरेश किडसण्णावर आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

Related Stories

प्रवाशी टेम्पो उलटून 30 जण जखमी

Amit Kulkarni

सिंदगीत सुरक्षा रक्षकाचा खून

Patil_p

अग्नीपथ विरोधात खानापुरात भव्य मोर्चा

Rohan_P

पोलिसाकडूनच पत्नीचा खून

Patil_p

रामदुर्ग तालुक्यात 520 जागांसाठी 1736 अर्ज दाखल

Patil_p

विश्वचषक विजेते रॉजर बिन्नी आज बेळगावात

Amit Kulkarni
error: Content is protected !!