Tarun Bharat

झोपडपट्टी धारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : अजित पवार

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टीधारकांना सर्व सुविधांयुक्त हक्काची घरे मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी झोपडपट्टी धारकांच्या गृहनिर्माण संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.

बांधकाम व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून झोपडपट्टी धारकांना कमी कालावधीत चांगल्या दर्जाची घरे बांधून द्यायला हवीत, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, झोपडपट्टी धारकांना वर्षभरात अधिकाधिक घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टया प्रसिध्द असणाऱ्या पुण्यातील नागरिकांच्या हिताचे निर्णय शासन गतीने घेणार आहे.  मेट्रो, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण अशा मोठ्या प्रकल्पांची कामे निधी अभावी रखडू नयेत, यासाठी वेळेत निधी उपलब्ध करुन दिला जाईल. प्राधिकरणाचे हे कार्यालय सुसज्ज झाले असून या जागेतून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोपडपट्टी धारकांना चांगल्या सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात.

 

Related Stories

बार्शी तालुक्यातून दोन जण हद्दपार

Archana Banage

अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराला मनसेचा विरोध

Archana Banage

कराड जनता बँकेच्या मुख्य कार्यालयात ठेवीदारांचा ठिय्या

Archana Banage

पक्ष सोडून गेलेल्यांची यादी आहे माझ्याकडे

Patil_p

आज बोलणाऱ्यांनी तोंड बंद करावीत, आशिष शेलारांचे राऊतांना जाहीर आव्हान

Rahul Gadkar

प्रचारगीतावरून भाजपकडून ‘आप’वर 500 कोटींचा दावा

prashant_c
error: Content is protected !!