Tarun Bharat

झोपडीवजा घरात राहतात अहमदाबादचे महापौर

साधी राहणी अन् निष्कलंक राजकीय जीवन

किरीट परमार यांनी गुजरातमधील महानगर असलेल्या अहमदाबादचे महापौर म्हणून पदभार हाती घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आणि दोनवेळा नगरसेवक राहिलेले किरीट परमार अहमदाबाद या महानगरात झोपडीवजा घरात राहतात. परमार यांना महापौरपद देऊन कुठलाही व्यक्ती मेहनत आणि कामाच्या बळावर मोठय़ा पदांपर्यंत पोहोचू शकतो असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न भाजपने  केल्याचे मानले जात आहे.

अहमदाबादच्या ठक्करबापानगर भागात नवे महापौर किरीट परमार यांचे घर आहे. सर्वसाधारण जीवन जगणारे परमार एका छोटय़ा घरात राहतात, पूर्ण गुजरातमध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा होत आहे. दैनंदिन गरजांकरता वापरल्या जाणाऱया साधनांच्या व्यतिरिक्त त्यांच्या घरात काहीच दिसून येत नाही. त्यांच्या घरात फ्रीज देखील नाही.

परमार दररोज संघाच्या शाखेत जातात. संघाच्या विचारधारेशी जोडले गेलेले परमार यांनी विवाह केलेल नाही. परमार यांनी बुधवारी सकाळीच अहमदाबादचे महापौरपद हाती घेतले आहे.

Related Stories

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक एक प्रक्रिया, युद्ध नाही : शशी थरूर

Archana Banage

‘ईडब्ल्यूएस’ची बदलणार नाही उत्पन्नमर्यादा ?

Patil_p

शेतकरी आंदोलनात आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

datta jadhav

दिल्लीत आज रात्रीपासून 6 दिवसांचा लॉकडाऊन!

Tousif Mujawar

धोका वाढला : पंजाबमध्ये 6,472 नवे कोरोना रुग्ण;142 मृत्यू

Tousif Mujawar

गुन्हे रद्द झाल्यानंतरच माघार

Patil_p