नवी दिल्ली : कोरोनामुळे मागच्या वषी झोमॅटोला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले होते. त्या काळात सुमारे 500 जणांना कंपनीने नारळ दिला होता. पण आता परिस्थिती सामान्य पातळीवर येत असून व्यवसायातील वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी येणाऱया काळात 400 जणांना सामावून घेणार असल्याचे सांगण्यात येते. कंपनीत सध्या काम करणाऱया कर्मचाऱयांची संख्या 3600 इतकी आहे. मे 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात कंपनीने अडचणी वाढल्याने एकूण कर्मचाऱयांपैकी 13 टक्के जणांना कमी केले होते.


previous post
next post