Tarun Bharat

झोमॅटोने केले ब्लिंकिटचे अधिग्रहण

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑनलाईन खाद्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी झोमॅटो कंपनी यांनी नुकतेच ब्लिंकिट या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. सदरच्या अधिग्रहणासाठी 4,447 कोटी रुपये झोमॅटोने मोजले असल्याचे सांगितले जात आहे.

झोमॅटोकडे ब्लिंकिटमधला 9 टक्के इतका वाटा आहे. ब्लिंकिट हे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. याआधी ब्लिंकिटसंबंधीच्या करारासाठी अंदाजे 700 दशलक्ष डॉलर्स देण्याचा विचार झोमॅटोने केला होता. मात्र, शेअर बाजारामध्ये समभागाच्या भावामध्ये घट झाल्याने कंपनीने अखेर 568 दशलक्ष डॉलर इतकी रक्कम देण्याचे प्रयोजन केले आहे.

कोण ही ब्लिंकिट ?

ब्लिंकिट ही ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी असून ती ग्राहकांना काही मिनिटातच आवश्यक त्या साहित्याची डिलिव्हरी करते. 15 मिनिटांमध्ये खाद्य पदार्थाची डिलिव्हरी ब्लिंकिटमार्फत झोमॅटोला आगामी काळामध्ये करता येणे शक्य होणार आहे.

Related Stories

राज्यपालांना धक्काबुक्की; काँग्रेसचे 5 जण निलंबित

Patil_p

काँग्रेस नेते मोतीलाल वोरा यांचे निधन

Patil_p

लोककल्याणकारी सरकार असमानता निर्माण करून भांडवलशाहीला चालना देऊ शकत नाही : वरुण गांधी

Sumit Tambekar

कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

लडाखमध्ये युद्धाच्या उंबरठय़ावर होता भारत

Amit Kulkarni

घरमालक, भाडेकरूंच्या न्यायालयाच्या फेऱया टळणार

Patil_p
error: Content is protected !!