Tarun Bharat

झोया टेभला हिचे ‘नीट’मध्ये घवघवीत यश

बेळगाव : केएलई इंडीपेंडन्ट पीयू कॉलेजची विद्यार्थिनी झोया टेभला हिने नुकत्याच झालेल्या ‘नीट-2020’ च्या परीक्षेत 720 गुणांपैकी 680 गुण घेऊन देशामध्ये 666 वा क्रमांक मिळविला आहे. तसेच 14.37 लाख परीक्षार्थ्यांमध्ये अनारक्षित विभागामध्ये तिने 427 वा क्रमांक पटकावला आहे. एकूण 99.95 इतकी गुण सरासरी मिळवून तिने हे अभिनंदनीय असे यश मिळविले आहे.

तिने सीईटी परीक्षेत कर्नाटक राज्यात 99.25 टक्के गुण घेऊन 6 वा क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर ‘जेईई मेन’ परीक्षेतही तिने 98.4 टक्के गुण मिळविले आहेत. बेळगाव येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. साजिद टेभला आणि आयुर्वेदिक कन्सल्टंट डॉ. मरयम टेभला या डॉक्टर दांपत्याची ती कन्या होय.

Related Stories

पश्चिम भागात दमदार, अन्य भागात रिमझिम

Amit Kulkarni

कृष्णेच्या पाण्यासाठी संयुक्तपणे लढा

Patil_p

बेंगळूरमध्ये नायजेरियाच्या दोन ड्रग विक्रेत्यांना अटक

Archana Banage

कणबर्गी हिंडाल्को रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

आता वीजबिलाचेही कानडीकरण

Amit Kulkarni

कॅपिटल वन एकांकिकेच्या चषकाचे अनावरण

Amit Kulkarni