Tarun Bharat

टपऱया बंद, मटका सुरु

गौरी आवळे/ सातारा

शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेजीत सुरू असलेला मटका व्यवसाय म्हणजे पोलीसांची धास्ती हाय का नाय असाच प्रश्न उपस्थित करणारी स्थिती पहायला मिळते. यात आकडय़ांचा खेळ हा फक्त कागदावर न राहता तो चालु-बंद टपऱयावर झळकवला जात आहे. यामुळे पोलीसांच्या पोकळ कारवाईचा मटका व्यवसायिकांवर फारसा परिणाम दिसत नाही.

सातारा शहर व शाहूपुरी भागात अनेक किरकोळ व्यवसाय करण्याच्या हेतूने टपऱया थाटल्या जातात. या टपऱयावर भाजीविक्री, खाद्य पदार्थ विक्री असे छोटे व्यवसाय करण्यात येतात. परत काही कारणास्त या टपऱया बंद होवून जागीच उभ्या राहतात. यामुळे या बंद टपऱयाचे वाढते अतिक्रमण सातारा नगरपालिकेला दिसत नाही. तर पोलीसही याकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसतात. याचा फायदा मात्र अवैधरित्या व्यवसाय करणारे मटका व्यवसायिक गेल्या अनेक वर्षापासून घेत आहेत. बंद टपरी ही पुढून उघडण्यापेक्षा मागून उघडून दररोज आकडय़ाचा खेळ खेळला जात आहे. या खेळाचा कोण विजेता यांची माहिती त्याच व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी या आकडय़ाच्या पाटय़ा खुलेआम टपऱयांवर झळकवल्या जात आहेत. हे आकडे कशाचे असा प्रश्न नागरिकांना नेहमीच पडत असतो. पोलीसांनाही या आकडय़ाची चांगलीच ओळख असते. तरीही कारवाई करण्याची तयार नेहमीच दाखवली जात नाही. ही बाब मटका व्यवसायिकांच्या चांगली पचनी पडली आहे. यामुळे कारवाईची धास्ती राहिली नसून हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढवण्यात भर दिला जात आहे.

हीच का ती मटक्याचे ठिकाणे….

शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका कोणत्या ठिकाणी सुरू असतो. असा प्रश्न पडण्याची गरज भासत नाही. पोलीसांना मिळणाऱया माहितीच्या आधारे

पोवईनाका, एसटी स्टॅड, गेडामाळनाका, आयटीआय रोड, गुरूवार परज, कमानी हौद, राजवाडा, मंगळवार तळे, भाजी मंडईच्या खाली पार्किग, जनावऱयांच्या दवाखान्यामागील पार्किग येथे मटका तेजीत सुरू असतो.

Related Stories

पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कडक कायदे होण्यासाठी आग्रही : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Archana Banage

विकेंड लॉकडाऊन शहरातील वातावरण

Patil_p

साताऱयाच्या नेत्यांमध्ये बुलडोझर चालवण्याची ताकद नाही

Patil_p

साताऱयात विभागाच्या बंगला परिसराला आग

Amit Kulkarni

औंधच्या श्रीयमाई देवीचा रथोत्सव साधेपणाने साजरा!

Patil_p

उद्धव ठाकरेंकडे प्रचंड वैचारिक दिवाळखोरी

datta jadhav