Tarun Bharat

टाकवडेत कोरोनाचा एक संशयित शासकीय यंत्रणा गतिमान

वार्ताहर / शिरढोन

टाकवडे तालुका शिरोळ येथील संशयित रुग्णाला ताप खोकला असल्याचे लक्षण आढळून आल्याने उपचारासाठी तो प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला होता. तेथील आरोग्याधिकारी यांनी त्याला सांगली ला जाण्याचा सल्ला दिला तिथे रुग्ण गेले असता त्याला मिरज येथे मिरज रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला तर तेथील अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातच सीपीआर ला जाण्याचा सल्ला दिला. अखेर तो रुग्ण सायंकाळी पाच वाजता घरी आला. ही माहिती ग्रामपंचायतीला मिळाल्यानंतर संबधीताला कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले या वृत्ताने गावात खळबळ माजली असून नागरिक भयभीत झाले आहेत. एकीकडे रुग्णांची हेळसांड व कोरोना ची धास्ती यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी सर्वत्र पसरल्यानंतर सकाळी घटनास्थळी मंडळाधिकारी बी डी गायकवाड, तलाठी या एच.आर. माळी, आरोग्य सेवक सुरज तराळ, सरपंच पी वाय पाटील आदी. पदाधिकारी उपस्थित होते. या भागातील रस्ता पूर्ण बंद करून नागरिकांना दक्ष राहण्याची सल्ला दिला गेलेला आहे. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना इचलकरंजी येथील आय.जी.एम हॉस्पिटल मध्ये तपासणीसाठी नेण्यात येणार असल्‍याची माहिती आरोग्य सेवक सुरज कराळे यांनी सांगितले तसेच रुग्णांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर शिरोळ येथील होम कॉर्नर टाईम मध्ये ठेवण्यात येणार असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले या वृत्ताने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

कोल्हापूर : गोकुळमध्ये सत्ता द्या; ८५ % परतावा देऊ

Archana Banage

महाराष्ट्रात 4,589 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

हातकणंगले तालुक्यात परतीच्या पावसाची सरासरी 62. 38 मि. मी.

Archana Banage

शेती पिक व इतर नुकसानीचे पंचनामे शनिवारपासून गतीने होणार

Archana Banage

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

Archana Banage

शिंदे सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे-शशिकांत पवार

Archana Banage