Tarun Bharat

टाटा मोटर्सची पंच दाखल

5.49 लाख सुरूवातीची किंमत – इग्नीस, किगरला टक्कर

वृत्तसंस्था/ मुंबई

टाटा मोटर्सची सुव्ह गटातील पंच ही कार अखेर सोमवारी बाजारात दाखल झाली आहे. सदरच्या कारची सुरूवातीची किंमत 5.49 लाख रुपये इतकी असणार आहे. विविध चार प्रकारात दाखल करण्यात येणारी ही गाडी मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्स्मीशनसह आली आहे. सदरची गाडी मारूती सुझुकीच्या इग्नीस, रेनॉच्या किगर व महिंद्राच्या कुव्ह 100 एनएक्सटीला टक्कर देईल असे सांगितले जाते.

प्युअर, प्युअर रिदम पॅक, ऍडव्हेंचर, ऍडव्हेंचर रिदम पॅक अशा विविध गटातील कारची किंमत ही 5 लाख 49 हजार ते 9 लाख 39 हजार रुपये इतकी असणार आहे. सुरक्षिततेच्या मानांकनात या कारला फाइव्ह स्टारचे रेटिंग मिळाले आहे. क्रॅश टेस्टमध्ये वरचे रेटिंग मिळवणारी पंच ही टाटाची तिसरी कार असल्याचे सांगितले जाते. याआधी 2018 मध्ये दाखल झालेल्या नेक्सॉनला आणि 2020 मध्ये दाखल झालेल्या अल्ट्रोज हिला असे रेटिंग मिळाले होते.

Related Stories

चीनमध्ये वाहन विक्रीत 14.5 टक्क्मयांची वृद्धी

Patil_p

महिंद्राची एक्सयुव्ही 700 कार ऑक्टोबरमध्ये येणार

Patil_p

मर्सीडिझ बेंझची नवी जीएलए कार बाजारात

Patil_p

वाहन स्क्रॅप पॉलिसी ; नव्या गाडीसाठी सवलत

Amit Kulkarni

‘ओला’ची इलेक्ट्रीक स्कूटर आंतरराष्ट्रीय बाजारात

Amit Kulkarni

एप्रिलमध्ये फोर्स मोटर्सने विकली 66 वाहने

Patil_p