Tarun Bharat

टाटा मोटर्स कर्जाचा भार हलका करणार

Advertisements

मुंबई

 आपल्या डोक्मयावरील कर्जाचा भार कमी करण्याचा इरादा टाटा मोटर्सने व्यक्त केला आहे. पुढील तीन वर्षाच्या कालावधीत कंपनी आपल्या डोक्मयावरील 48 हजार कोटी रुपयांचे कर्ज टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. यासंदर्भातली रणनीती कंपनीने आखली आहे. कंपनीच्या भागधारकांच्या बैठकीमध्ये चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी वरील माहिती दिली आहे. जून तिमाहीअखेर कंपनीला 8 हजार 437 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. मागच्या वषी याच कालावधीत हा तोटा 3 हजार 698 कोटी रुपयांचा झाला होता. मागणीतील घट आणि पुरवठय़ातील व्यत्यय यामुळे कंपनीला जबर तोटा सहन करावा लागला आहे. एकंदरच कर्जाचा वाढलेला डोंगर कमी करण्यासाठी भविष्यकाळात कंपनी जोरकसपणे प्रयत्न करणार असल्याचे चंद्रशेखरन यांनी सांगितले.

Related Stories

आयटी उद्योगाचा विकास प्रगतीपथावर

Patil_p

‘फँटसी गेमिंग’ला बरकत!

Omkar B

जगातील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रक

Patil_p

भारतीय खेळण्यांची विक्री वाढली

Patil_p

अमेरिकेच्या व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सची रिलायन्स ‘जिओ’मध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

पोलादाच्या किमती वाढल्या

Patil_p
error: Content is protected !!