Tarun Bharat

टाटा समूहाकडून सुपरऍप ‘न्यू’ चे सादरीकरण

Advertisements

ग्रॉसरीसह विमान व हॉटेल बुकिंगची सुविधा होणार उपलब्ध

वृत्तसंस्था./ मुंबई

टाटा समूहाकडून 7 एप्रिल रोजी गुरुवारी आपले मोस्ट अवेटेड सुपरऍप न्यू (Neu) याचे सादरीकरण करण्यात आले आहे. सदरच्या ऍपला गुगल प्ले स्टोअरवरती डाऊनलोड करता येणार आहे. आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक जणांनी ऍप डाऊनलोड केले आहे. आमच्या प्लॅटफॉर्मचा जास्तीत भारतीयांना उत्तम असा लाभ उठवता यावा यासाठी हे नवे ऍप सादर केले असल्याचा दावा टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी केला आहे. किराणा वस्तुंच्या खरेदीपासून ते बऱयाचगोष्टी जशा की गोळय़ा, औषधे व अगदी हॉटेल बुकिंगही एकाच ऍपच्या माध्यमातून एकाच छताखाली विविध सेवांचा लाभ ग्राहकांना होणार आहे, असेही ते म्हणाले.

सर्व ब्रँड्स एकाच छताखाली

चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे, की ‘टाटा न्यू एक एक्साइटिंग प्लॅटफॉर्म आहे,   विश्वासपूर्ण असणाऱया ब्रँड्समध्ये एअर आशिया, बिगबास्केट, क्रोमा, आयएचसीएल, क्यूमिन, स्टारबक्स, टाटा 1 एमजी, टाटा क्लिक, टाटा प्ले, वेस्टसाइड यांना या प्लॅटफॉर्मवर बघून मला अभिमान वाटत आहे. यासोबतच विस्तारा, एअर इंडिया, टायटन, तनिष्क, टाटा मोर्ट्सही लवकरच या प्लॅटफॉर्मसोबत जोडले जाणार आहेत.’

काय आहे सुपरऍप ?

ब्लॅकबेरीचे संस्थापक माइक लॅजारिडिस यांनी 2010 मध्ये सुपरऍप शब्द दिला होता. सुपर ऍप म्हणजे एक असा प्लॅटफॉर्म कि ज्यावर सर्व आवश्यक वस्तू आणि सेवा मिळते. चीनमध्ये एक असे ऍप आहे, वीचॅट (WeChat) सुरुवातीला मॅसेजिंग ऍपच्या पातळीवर रचना केली होती. यानंतर यावर पेमेन्ट, शॉपिंग, फूड ऑर्डरिंग, कॅब सर्व्हिसही मिळू लागली.

Related Stories

विंडी लेकसाइड करणार अदानीत गुंतवणूक

Patil_p

टेक महिंद्रा आगामी पाच वर्षांमध्ये 3000 जणांची करणार नियुक्ती

Amit Kulkarni

किरकोळ वाढीसह दोन्ही निर्देशांक बंद

Amit Kulkarni

रिलायन्स उद्योगाची नफ्यात चमकदार कामगिरी

Patil_p

शेअर बाजारात सप्ताहाचा शेवट तेजीने

Omkar B

जागतिक सकारात्मक संकेताने बाजार तेजीत

Patil_p
error: Content is protected !!