Tarun Bharat

टाटा समूहाकडून 500 कोटींचा मदतनिधी

ऑनलाइन टीम / मुंबई :

कोरोना लढय़ासाठी टाटा समूहाकडून 500 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. टाटा समूहाचे मालक रतन टाटा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

याबद्दल माहिती देताना रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पत्र शेअर केले आहे. यामध्ये ते म्हणतात, यापूर्वीही देशावर संकटे आली. या संकटाच्या काळात टाटा समूहाने आपले योगदान दिले आहे. आताही कोरोना व्हायरसने देशाला ग्रासले असून सध्या भारताची स्थिती गंभीर आहे. या गंभीर काळात तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यामुळे या लढाईत टाटा समूहाकडून वैद्यकीय साहित्य आणि अत्यावश्यक गरजांसाठी 500 कोटी रुपये जाहीर करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

अशोक लेलँड करणार उत्पादनात घट

Patil_p

जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पाचव्या स्थानी

datta jadhav

‘आयपीओ’त गुंतवणूक करावी का?

Omkar B

आयकियाचे छोटे विक्री केंद्र सुरू

Amit Kulkarni

डार्क वेब-सायबर क्राईमचे अंडरवर्ल्ड

Patil_p

अदानी समूह आता स्टील व्यवसायात उतरणार

Amit Kulkarni