Tarun Bharat

टाटा स्टील 270 कोटींचा देणार बोनस

जमशेदपूर : देशातील दिग्गज व खासगी क्षेत्रातील पोलाद निर्मितीच्या व्यवसायात कार्यरत असणारी टाटा स्टील कंपनी आर्थिक वर्ष 2020-2021 साठी वार्षिक बोनसच्या स्वरुपात एकूण 270.28 कोटी रुपयांची रक्कम देणार असल्याची माहिती आहे.

कंपनीने सांगितले आहे, की 2020-2021 वार्षिक बोनसच्या स्वरुपात पेमेन्ट देण्यासाठी टाटा स्टील आणि टाटा वर्कर्स युनियनच्या दरम्यान बुधवारी एक करार करण्यात आला असून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

कंपनीच्या सर्व शाखांमधील पात्र कर्मचाऱयांना हा बोनसचा निधी देण्यात येणार असून कमीत कमी 34,920 रुपये आणि जास्तीत जास्त 3,59,029 रुपये दिले जाणार असल्याचा अंदाज आहे.

Related Stories

अशोक लेलँड तिमाहीत नफ्यात

Amit Kulkarni

भारतामधील सोन्याची मागणी घटली

Amit Kulkarni

झोमॅटोचा महसूल दुप्पट वाढला

Patil_p

बायोकॉनचा डीकेएसएचसोबत करार

Patil_p

ऑटो एक्स्पो पुढील वर्षी जानेवारीत

Patil_p

अनअॅकेडमीने केली नोकरकपात

Amit Kulkarni
error: Content is protected !!