Tarun Bharat

टायगर-दिशा संबंधी मुंबई पोलिसांच्या ‘त्या’ ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा


मुंबई\ ऑनलाईन टीम

लॉकडाउनमध्ये बाहेर फिरणे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणीला चांगलेच महागात पडले आहे. लॉकडाउनमध्ये बाहेर फिरल्यामुळे मुंबई पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेत मुंबई पोलिसांनी एक ट्वीट करत त्यांना अप्रत्यक्षपणे टोला देखील लगावला आहे. सध्या या ट्वटीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक देखील होत आहे.

मुंबई पोलिसांचे ट्वीट

मुंबई पोलिसांनी ट्वीट करत म्हटले आहे की, व्हायरस विरोधात सुरु असलेल्या लढाईमध्ये वांद्रे येथील रस्त्यांवर ‘मलंग’ बनून फिरणाऱ्या दोन कलाकारांना विरोधात आयपीएस (भादंवि) कलम १८८, कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही मुंबईकरांना विनंती करतो की, गरज नसताना ‘हीरोपंती’ करणे टाळा, ज्यामुळे कोरोनाच्या सूचनांचे उल्लंघन होईल.


सध्या मुंबई पोलिसांच्या या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेता टायगर श्रॉफ आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी यांच्या नावाचा उल्लेख न करता टायगरच्या सिनेमाचा उल्लेख करत ‘हीरोपंती’ करणे टाळ, असे म्हणत मुंबई पोलिसांनी टोला लगावला आहे.

कोरोनाच्या नियमांलेच पालन न केल्यामुळे करण्यात आला गुन्हा दाखल

मंगळवारी १ जून रोजी टायगर आणि दिशा जीममधून परत येत होते. त्याचवेळी ते वांद्रे परिसरात दुसरी फेरी मारताना दिसले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना अडवले होते. त्यानंतर कोरोनाच्या नियमांलेच पालन न केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या या कारवाईनंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे.

Related Stories

राजगृहावरील तोडफोड प्रकरणी सोलापुरात निदर्शने

Archana Banage

मेट्रो प्रकल्प : ‘त्यांना’ विश्वासात घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा

Tousif Mujawar

लघूपटासाठी शेफाली शहाचे कौतुक

Amit Kulkarni

पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढीविरोधात बेमुदत उपोषण

datta jadhav

डॉ. प्रकाश आमटे पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल

datta jadhav

दीपिकाने दिली ड्रग्ज चॅटची कबुली; सारा, श्रद्धाची चौकशी सुरु

Tousif Mujawar