Tarun Bharat

टायटनच्या नव्या दालनाचा थाटात शुभारंभ

बेळगावकरांच्या सेवेत : चष्मे, गॉगल्स, घडय़ाळे, बेल्ट, पर्फ्युम उपलब्ध

प्रतिनिधी / बेळगाव

टायटन वर्ल्डचे दुसरे आणि टायटन आय प्लस स्टोअर्सच्या पहिल्या दालनाचा शुभारंभ गुरुवारी खडेबाजार, संयुक्त महाराष्ट्र चौक येथे थाटात पार पडला. केएलईचे चेअरमन प्रभाकर कोरे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील व सुनील सरूर आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व फीत सोडून उद्घाटन करण्यात आले.  

या टायटन आय प्लस स्टोअरमध्ये आधुनिक चष्मे, स्मार्ट घडय़ाळे, बेल्ट, मनी पॉकेट आणि पर्फ्युम आदी उपलब्ध करण्यात आले आहे. स्टायलिस्ट, सुंदर चष्मे, रंगीबेरंगी ब्रँडची स्मार्ट घडय़ाळे आणि इतर आकर्षक वस्तू बेळगावकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. त्याबरोबरच विविध प्रकारचे चष्मे, गॉगल्स आणि लेन्स ठेवण्यात आले आहेत. टायटन वर्ल्डमध्ये पुरुष-महिला, युवक आणि बालकांना आकर्षित करणारे चष्मे, स्मार्ट घडय़ाळे उपलब्ध आहेत. शिवाय 1500 हून अधिक व्हरायटीची घडय़ाळे तर 8000 हून अधिक विविध नमुन्यांमध्ये चष्मे उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे सोयीस्कर होणार आहे. टायटन रागाचे ‘मसाबा कलेक्शन’ तसेच फास्टट्रक, रिप्लेक्स, फास्टट्रक प्ले प्लस, फास्टट्रक रिप्लेक्स वॉक्स, टायटन स्मार्ट प्रो या शृंखलेत अनेक व्हरायटी आहेत. याबरोबर सोनाटा बँडचे सर्व्हिस सेंटरही ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

टायटन कंपनी, टाटा ग्रुप आणि तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या समन्वयाने 1987 मध्ये सुरू झाली. तर 1994 मध्ये टायटनने तनिष्क या नावाने दागिन्यांच्या क्षेत्रात पदार्पण केले. आणि तेव्हापासून घडय़ाळे आणि दागिन्यांमध्ये ठसा उमटविला आहे. बेळगावात टायटनची ही सेवा सुरू झाली असून इतर ठिकाणीही स्टोअर सुरू होणार आहेत.

Related Stories

श्रेष्ठा फौंडेशनतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

Amit Kulkarni

उमेदवारांना निवडणूक लढविण्याची तर शेतकऱयांना ऊस उचल-बटाटा लागवडीची चिंता

Omkar B

युवकाचा प्राण वाचविणाऱया साहिल काजूकरचा सत्कार

Amit Kulkarni

वडगाव येथील ‘ते’ अतिक्रमण थांबवा

Amit Kulkarni

कोरोनाच्या संकटछायेत शुभ मुहूर्ताचा दिवस नीरव शांततेत

Patil_p

फुटपाथची खोदाई करण्यात आल्यामुळे झाडे कोसळण्याचा धोका

Patil_p