Tarun Bharat

टायरची चोरी करणाऱया पोलिसासह तिघांवर गुन्हा

Advertisements

प्रतिनिधी/सोलापूर 

बेकायदा वाळूची वाहतूक करणारे ट्रक काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर ते ट्रक जुनी पोलीस वसाहतीच्या आवारात उभे करण्यात आले होते. दरम्यान, या ट्रकचे सुमारे 40 हजार रुपये किंमतीचे टायर चोरी करताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यामध्ये शहर पोलीस दलातील एका पोलिसाचा समावेश आहे. चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कारवाई करुन पकडलेली वाहने सुरक्षित नसल्याचेच यामुळे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अक्कलकोट तालुक्याच्या परिसरातून वाळूची बेकायदा वाहतूक करणाऱया ट्रक अक्कलकोट पोलिसांनी कारवाई करुन ताब्यात घेतले होते. यातील ट्रक पळविल्याचाही प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता, अशी चर्चा पोलिसात होती. ट्रक पळवून नेल्याची चर्चा असतानाच मंगळवारी एका पोलिसाने साथीदाराच्या मदतीने पोलिसांनी कारवाई दरम्यान पकडलेल्या एम.एच. 12 ए.यू. 7937 या क्रमांकाच्या ट्रकचे टायर चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. वेळीच ही गोष्ट संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत अक्कलकोट पोलीस ठाण्यात, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब ब्रह्मदेव शिंदे (नेमणूक जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर), सोमा विठ्ठल गायकवाड (रा. बोळकवठा, ता.दक्षिण सोलापूर), गणेश मल्लेश मरेवाले (रा. मळसिद्धनगर, मंद्रुप, दक्षिण सोलापूर), दयानंद बसवराज यळकर (रा. मळसिद्धनगर, मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाने आठ जणांचा मृत्यू, 291 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये 549 नवे रुग्ण, 16 जणांचा कोरोनाने मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर : अक्कलकोट येथे युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

Abhijeet Shinde

स्वयंघोषित गुरु नित्यानंद विरोधात इंटरपोलकडून नोटीस जारी

prashant_c

रेल्वेने दोन कोटी रुपये प्रवाशांचे केले परत

Abhijeet Shinde

सुवर्णा म्हेत्रे यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!