Tarun Bharat

टाळेबंदीनंतर प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार

पंढरपूर / प्रतिनिधी

टाळेबंदी नंतर राज्यात प्रथमच आता यात्रा भरली जाणार आहे. पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेत असून राज्यातील यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि पंढरपुर प्रशासनाने सकारात्मकता दाखवली असून कार्तिकी यात्रेची तयारी मंदिरात सुरू करण्यात आली असल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षात पंढरपूरच्या सहा मोठ्या यात्रा झाल्या नाहीत.

कोट्यावधी भाविकांना विठ्ठलाचे दर्शन यात्रा कालावधीत मिळाले नाही. परंतु आता कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरवण्यास प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे. यासाठी सर्वप्रथम मंदिर समितीने यात्रा भरवण्यात सकारात्मकता दाखवून जास्तीत जास्त भाविकांना कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाचा अनुषंगाने आरोग्यविषयक सर्व नियम पाळून दर्शन दिले जाणार असल्याची भूमिका जाहीर केली. यानंतर आता राज्य शासनाकडून यात्रा भरण्यास परवानगी दिली जाऊ शकते. असा एक कल आहे.

कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी निमंत्रण येत्या दोन दिवसात मंदिरे समितीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. यंदा वारकऱ्यांसोबत विठ्ठलाची शासकीय महापूजा होईल. असा विश्वास मंदिर समिती सदस्यांना आहे. कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने सहा नोव्हेंबरपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन हे सुरू राहणार आहे. तर विठ्ठलाच्या मुखदर्शनाची रांग देखील सुमारे चार किलोमीटर पर्यंत लांब तयार करण्याचे काम मंदिरे समितीच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे.

कार्तिकी यात्रा भरवण्यात बाबतचा प्रस्ताव मंदिरे समितीच्या माध्यमातून सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात येईल. यानंतर या बाबत शासनस्तरावर कार्तिकी यात्रा भरण्याचा निर्णय होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूरची यंदाची कार्तिकी यात्रा भरण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात टाळेबंदी नंतर प्रथमच आता यात्रा भरली जाणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठ्ठलाला आत्तापर्यंत 28 किलो सोने आणि 996 किलो चांदी दान स्वरूपात प्राप्त झाली आहे. यामध्ये आता मंदिर समितीच्या माध्यमातून 28 किलो सोने वितळून विठ्ठलाचे नवीन सुवर्णालंकार तयार करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लवकरच सावळा विठोबा नवीन अलंकारात दिसण्याची शक्यता आहे.

Related Stories

‘सारथी’बाबत अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा

Archana Banage

”मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमार यांच्या घरी जाण्यास वेळ मात्र लोणकरच्या आईला भेटायला वेळ नाही”

Archana Banage

श्रीरामपूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

datta jadhav

इचलकरंजी येथे दीड लाखांचा गुटखा जप्त

Archana Banage

‘मेंदू तल्लख करणारे आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन त्यांना सुचवा’

Archana Banage

पुणे महानगरपालिकेसमोर ‘त्या’ नागरिकांचे ठिय्या आंदोलन; केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar
error: Content is protected !!