Tarun Bharat

टास्कफोर्स समितीवर कोरोना नियंत्रणाची जबाबदारी

@ प्रतिनिधी/ बेळगाव

शहरात कोरोना विषाणूंचा फैलाव वाढतच असल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर्डस्तरीय टास्कफोर्स कमिटय़ा सथापन करण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण होवू नये, तसेच लागण झालेल्या रुग्णाबाबत कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबाबतचे प्रशिक्षण टास्कफोर्स कमिटीच्या सदस्यांना सोमवारी ऑनलाईनद्वारा देण्यात आले.

महापालिकेच्या माध्यमातून वॉडस्तरीय टास्कफोर्स कमिटीची स्थापना करण्याचा आदेश राज्य शासनाकडून बजावण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हास्तरीय समिती स्थापन करून कोरोना विषाणूंबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, परराज्यांमधून तसेच राज्यांतर्गत येणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर नजर ठेवणे तसेच मोबाईलद्वारे ट्रक करण्यात येत आहे. तरीही काही नागरिक खोटी माहिती व पत्ता देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोराना विषाणूंची लागण झालेल्या नागरिकांची माहिती घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याच्यादृष्टीने वॉर्डस्तरीय टास्कफोर्स कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी, वॉर्ड क्लार्क, महसूल निरीक्षक, आरोग्य खात्याचे कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक आणि सामाज कल्याण खात्याचे अधिकारी, आशा कार्यकर्त्या आदींची टास्कफोर्स कमिटी करण्यात आली आहे. सदर कमिटीला सोमवारी महापालिका कार्यालयात ऑनलाईनद्वारा प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक वॉर्डकरिता एक टास्कफोर्स कमिटी करण्यात आली असून सहा-सात कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 1 ते 39 पर्यंतच्या टास्कफोर्स समितीच्या सदस्यांना कुमार गंधर्व सभागृहात आणि वॉर्ड क्रमांक 40 ते 58 पर्यंतच्या सदस्यांना महापालिका सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले.

परराज्यांमधून आलेल्या नागरिकांची माहिती मिळाल्यास त्यांची तपासणी करून होम क्वॉरंटाईन करणे, कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यास त्या नागरिकांच्या निवासस्थानी कंटेन्मेंट झोन करणे तसेच होम क्वॉरंटाईन नागरिकांवर नजर ठेवणे, वृद्ध नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणे, कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी करणे आदींसह विविध जबाबदाऱया टास्कफोर्स कमिटीवर सोपविण्यात आल्या असून याची माहिती ऑनलाईन प्रशिक्षणावेळी देण्यात आली. 

Related Stories

रावसाहेब गोगटे चषकाचा गजानन गावडोजी मानकरी

Amit Kulkarni

सदलगा पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत अधिकाऱयांच्या जाळय़ात

Omkar B

अखेर किणये मुख्य रस्ता दुरुस्तीला प्रारंभ

Amit Kulkarni

सदाशिव आयोगाला मान्यता द्या

Patil_p

मुलांसाठी पहिला बालक्लब आता बालसभा

Amit Kulkarni

बांदल सेना शौर्य दिवस गांभीर्याने

Amit Kulkarni