Tarun Bharat

‘टिप्स’ मारणार मराठी गाण्यांचे शतक

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे :

संगीत क्षेत्रात अग्रणी असणाऱया ‘टिप्स मराठी’ या यूटय़ूब चॅनलने विनोदवीर अभिनेता भाऊ कदमवर चित्रीत झालेलं ‘गोल्डीची हळद’ हे नवं कोरं धमाकेदार मराठी गाणं रसिकांसाठी आणलं आहे. प्रवीण कोळी, केवल वाळंज आणि स्नेहा महाडीक यांनी गायलेल्या या हळदीच्या गीतात महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर भाऊ कदम आपल्या अनोख्या डान्सिंग स्टाईलमध्ये लक्ष वेधून घेताना दिसणार आहे.

या गाण्यासोबतच अनेक नावाजलेल्या कलाकारांसोबत ‘टिप्स’ची गाणी येणार आहेत. युटयूबवर धुमाकूळ घालणारं 150 मिलियन्स व्ह्यूज मिळालेलं ‘गोव्याच्या किनाऱयावर’ या गाण्याचा गायक रजनीश पटेल नव्या अंदाजातील ‘लव्ह फिव्हर’ गाणं घेऊन येत आहे. टिप्सच्या आगामी गाण्यांमध्ये सावनी रवींद्र, धृवन मूर्ती, निलेश पाटील, रुपाली मोघे, अभिषेक तेलंग संगीत विश्वातील या आघाडीच्या तरुण गायकांचा स्वरसाज लाभला असून तर ओमप्रकाश शिंदे, नम्रता प्रधान, सिद्धी पाटणे, नितीश चव्हाण, शिवानी बावकर आदि तरुण कलाकार या गाण्यांमध्ये दिसणार आहेत. तसेच ‘बालक–पालक’, ‘टाईमपास’ चे सुप्रसिद्ध संगीतकार चिनार-महेशसुद्धा नव्या गाण्यांसाठी ‘टिप्स’ सोबत काम करणार आहेत.

Related Stories

विश्वसुंदरीला जडलाय वजन वाढण्याचा रोग

Patil_p

ललित – सईची कलरफुल लव्हस्टोरी

Patil_p

जॅकलीन फर्नांडिसची हॉलिवूडवारी

Patil_p

…म्हणून रियाच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी रद्द

Rohan_P

’बागी 3’ ने केले रंगांची उधळण !

tarunbharat

मुंबईत राहण्यासाठी मला केवळ ‘त्याच्या’ परवानगीची गरज : कंगना

Rohan_P
error: Content is protected !!