Tarun Bharat

टिम इंडियाचा ‘सुपर विजय’, मालिकाही खिशात

Advertisements

ऑनलाईन टीम / हॅमिल्टन : 

हिटमॅन रोहित शर्माच्या तडाखेबाज दोन सिक्सच्या जोरावर टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा विजय खेचून आणला. न्यूझीलंडविरूद्धची पाच सामन्याची टी-ट्वेंटी मालिका 3-0 ने खिशात घातली.

दरम्यान, मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलरला शामीनं बाद केल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 17 रनची गरज होती. सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवर 10 रनची गरज असताना रोहित शर्माने टीम साऊदीच्या दोन्ही बॉलला सिक्स मारून भारताला मॅच जिंकवून दिली.

तत्पूर्वी, रोहित शर्माने 65 कर्णधार विराट कोहली 38 आणि के एल राहुलच्या 27 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या होत्या. भारताने ठेवलेल्या 180 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 179 स्कोअर केला होता.

कर्णधार केन विलियमसनने 95 धावांची खेळी केली. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

 

Related Stories

IMD : पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा, मच्छिमारांना अलर्ट

Abhijeet Khandekar

Kolhapur : शहरातील नाले सफाईचा बट्य़ाबोळ

Archana Banage

सूर्यकुमार यादवला सर्वोत्तम दुसरे मानांकन

Patil_p

हैदराबादमध्ये प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धा

Patil_p

सानिया मिर्झाचे पहिले जेतेपद

Patil_p

हॅम्बुर्गच्या फुटबॉलपटूवर पाच सामन्यांची बंदी

Patil_p
error: Content is protected !!