Tarun Bharat

टिळकवाडी पोलिसांनी केली कोरोनाबाबत जनजागृती

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती अजूनही सुरूच आहे. मंगळवारी टिळकवाडी पोलिसांनी गोवावेस जवळील रिक्षाचालकांना घेऊन ही जनजागृती केली आहे. वाहनचालकांना तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच सोशल डिस्टन्स राखण्याबाबत सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी अजूनही मोठा धोका आहे. तेंव्हा कोरोनापासून प्रत्येकाने संरक्षण घेतलेच पाहिजे. रस्त्यावर कोणीही थुंकू नये, याचबरोबर तोंडाला मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे ही काळाची गरज आहे, असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.

हातामध्ये मोठे बॅनर घेऊन याबाबत जनजागृती करण्यात आली. तेथून ये-जा करणाऱया वाहनचालकांना तसेच नागरिकांना कोरोनापासून संरक्षण मिळविण्याबाबत माहिती सांगण्यात आली. यावेळी टिळकवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी तसेच रिक्षाचालक उपस्थित होते..

Related Stories

विविध ठिकाणी महिला दिन साजरा

Amit Kulkarni

बोगस बांधकाम कामगारांना दणका

Patil_p

फार्महाऊसवर झोपलेल्या वॉचमनचा खून

Omkar B

समितीच्या सिंहाला दिल्लीत पाठवून देण्याचा निर्धार

Amit Kulkarni

कपिलतीर्थ मंडळाच्या युवकांची गडकोट मोहीम

Patil_p

बेळगाव जिह्यात शुक्रवारी 304 जणांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar