Tarun Bharat

टिळकवाडी येथील कवळेमठासमोर कचऱयाचे ढिगारे

कचरा उचलण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष

प्रतिनिधी / बेळगाव

शहरात कचऱयाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. टिळकवाडी येथील कवळेमठ समोर कचराकुंडी नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. त्यामुळे हा परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडला आहे. तसेच मंगळवारपेठ येथील सायन्स पार्कच्या मागे देखील कचरा टाकण्यात आल्याने हीच समस्या उद्भवली असल्याचे पाहायला मिळत आहे.

महापालिकेच्यावतीने घरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था केली आहे. मात्र नागरिक हा कचरा घंटागाडीकडे देण्याऐवजी रस्त्यावर टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून अस्वच्छता पसरली आहे. या दोन्ही ठिकाणी साठलेला कचरा उचलण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने येथील कचऱयाची उचल करून याठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

सप्तरंगी होऊ दंग; नको रंगाचा बेरंग!

Amit Kulkarni

आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

Tousif Mujawar

शेतकऱयांना उच्च न्यायालयातच घ्यावी लागणार धाव

Amit Kulkarni

बँक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम होतेय गायब

Tousif Mujawar

मराठी परिपत्रकांसाठी उद्या विराट मोर्चा

Patil_p

रेल्वेस्थानकासमोरील बसस्थानकाच्या कामाची गती वाढवा

Patil_p