Tarun Bharat

टीईटी परिक्षेला बसू न दिल्याचा परिक्षार्थ्यांचा आरोप

परीक्षा केंद्रावरील केंद्र प्रमुखांवर लावला आरोप

प्रतिनिधी/ सातारा

रविवारी घेण्यात आलेल्या टीईटी परिक्षेसाठी लाल बहादूर शास्त्राr या महाविद्यालयात या परिक्षेचा बोर्ड किंवा कोणतीही सुचना न लावल्याने परिक्षार्थीचा गोंधळ उडला. यामुळे परिक्षा केंद्र शोधण्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला. अनेकांना वेळेत केंद्रावर पोहचता आले नाही. यामुळे केंद्र प्रमुखांनी परिक्षार्थींना परिक्षा केंद्रात प्रवेश दिला नसल्याचे परिक्षार्थ्याकडून सांगण्यात आले.

   एसटीचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागात एसटी बसची सेवा बंद झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाश्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यातच रविवारी दि. 21 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत शिक्षक पात्रता परिक्षा 13 केंद्रावर संपन्न झाली. या परिक्षेसाठी सातारा जिह्यातून दुर्गम भागातून परिक्षार्थी आले होते. एसटीबस च्या फेऱया बंद असल्याने अनेकजण खाजगी वाहनाने आले. यामुळे वेळेत पोहचने सगळ्यांना शक्य झाले नाही. असेच काही परिक्षार्थ्याचे नंबर हे लाल बहादूर शास्त्राr महाविद्यालयात आले होते. या परिक्षार्थ्यांना परिक्षा केंद्राची माहिती नसल्याने त्यांना केंद्र शोधण्यातच वेळ वाया गेला. यामुळे केंद्रावर वेळेत पोहचता आले नाही. परिक्षा सुरू होण्यासाठी 10 मिनिटे असल्याने यांना केंद्रावर प्रवेश नकारण्यात आला. केंद्र प्रमुखांना विनंती करूनही त्यांनी परिक्षार्थ्यांना प्रवेश न दिल्याने अनेक परिक्षार्थी नाराज झाले. महाविद्यालयाच्या बाहेर बऱयाच वेळ उभे राहत त्यांनी आपल्याला प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला तरीही प्रवेश मिळाला नाही.

Related Stories

कोरोनो पासून बचावासाठी आरोग्य पोलिस व ग्रामपंचायत विभागांचे महत्त्व अनन्यसाधारण

Archana Banage

भूस्खलन झालेल्या ठिकाणी तातडीने मदत पोहचवा; मंत्री देसाईंच्या सूचना

datta jadhav

अपघातासंदर्भात माहिती मिळण्यासाठी लवकरच मुंबई-पुणे हायवेवर ITMS सिस्टिम तयार करणार-देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

datta jadhav

शाहूपुरीतील तो रुग्ण झोडत होता पाटर्य़ा

Patil_p

…यासाठी राजीनामा दिला नाही : सभापती जमादार

Archana Banage