Tarun Bharat

टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांना ईडीकडून समन्स जारी

  • पत्नी रुजीरा यांनाही चौकशीसाठी बोलावले
Advertisements

ऑनलाईन टीम / कोलकाता :

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने दोघांकडून बँक तपशीलही मागितला आहे. ईडीने कोळसा घोटाळा प्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी 6 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे, तर त्यांच्या पत्नीला 1 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. या दोघांव्यतिरिक्त अन्य तीन जणांनाही ईडीने समन्स जारी केले आहेत.

अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा यांच्यावर कोळसा घोटाळ्यात सामील झालेल्या कंपन्यांकडून आणि त्यांच्याशी संबंधित लोकांकडून त्यांच्या कंपनीमध्ये निधी हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. निधीच्या बदल्यात त्या कंपन्यांसोबत बोगस करार करण्यात आल्याचेही आरोप आहेत. अभिषेकचे वडील अमित बॅनर्जी देखील त्यापैकी एक दिग्दर्शक आहेत. सीबीआय कोळसा घोटाळ्याची चौकशी करत आहे.

Related Stories

Sachin Pilot : काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर ‘कारवाई’ करण्याची सचिन पायलट यांची मागणी

Kalyani Amanagi

फेब्रुवारीत घाऊक महागाई 13.11 टक्क्यांवर

Patil_p

बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

Archana Banage

कियाने विकल्या 16 हजारहून अधिक कार्स

Patil_p

श्रीनगरमध्ये CRPF आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; इंटरनेट सेवा बंद

datta jadhav

एसटी कर्मचारी संप: परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

Archana Banage
error: Content is protected !!