Tarun Bharat

टीका होत असतानाही तिरथ सिंह रावत ‘त्या’ विधानावर ठाम


नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांचे नाव सध्या देशभरात चांगलेच चर्चेत आहे. फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असे वक्तव्य रावत यांनी केले होते. त्यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीकाचे झोड उठली आहे. मात्र टीका होत असतानाही रावत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.

तिरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबाबत केलेले वक्तव्य चांगले गाजत आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. यावर तिरथ सिंह रावत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझा महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही. पण, फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच आहे.

तिरथ सिंह रावत नेमके काय म्हणाले होते ?

“एकदा मी विमानातून प्रवास करत असताना मी पाहिले की एक तिच्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारले की कुठे जायचे आहे? यावर ती महिला दिल्लीला जायचे आहे असे म्हणाली. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. त्यावेळी माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. लोकांना भेटते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करते. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असे काही नव्हते,” असेही रावत यावेळी म्हणाले होते. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चालले आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावे लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावे लागणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

महिला नेत्यांनी देखील सोशल मीडियाचा आधार घेत साधला निशाणा

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वधेरा, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी , शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी रावत यांना ट्विटरवरून लक्ष्य केले आहे. रावत यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Related Stories

बसवराज बोम्माई यांनी शपथविधीपूर्वी येडियुराप्पांची घेतली भेट

Archana Banage

‘लष्कर’च्या संशयित दहशतवाद्याला अटक

Patil_p

जबरदस्तीने बाहेर पाठवून गद्दारांचा शिक्का मारतायं; केसरकरांचा ठाकरे आणि राऊतांवर हल्लाबोल

Abhijeet Khandekar

दिल्लीत मागील 24 तासात 227 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

दिल्लीत आज दिवसभरात 1035 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

कौतुक करावे तितके कमीच

Patil_p