Tarun Bharat

टीजेएसबीच्या नफ्यात विक्रमी वाढ

ठाणे

 टीजेएसबी बँकेने आपले लेखापरीक्षित परिणाम नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये आपल्या पारदर्शक व्यवहारांची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बँकेच्या ठेवींमध्ये 675 कोटींची वाढ होऊन बँकेच्या एकूण ठेवी रु. 12,049 कोटी झाल्या आहेत.

कोरोना आपत्तीमुळे संपूर्ण आर्थिक जगतात आणि त्यामुळे बँकिंग विश्वातही एक प्रकारची अनिश्चितता होती. व्यवसाय वृद्धीला मर्यादा होत्या. या पार्श्वभूमीवर टीजेएसबीच्या संचालक मंडळाने ग्राहकहित केंद्रस्थानी ठेऊन आर्थिक वर्षाच्या वाटचालींची रूपरेषा आखली. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व ग्राहकांना कमीतकमी व्याजदराने तरलता त्वरित उपलब्ध करून दिली. टीजेएसबी सहयोग आणि टीजेएसबी स्वयम् या नवीन कर्ज योजना राबवल्या. कर्जदारांच्या नफ्यावरील ताण लक्षात घेऊन बँकेने नियमित कर्जफेड करणाऱयांना व्याजदरात आकर्षक सवलत दिली. बँकेने कर्जदारांना 6 महिने मोरॅटोरियमची सुविधा उपलब्ध करून दिली.

Related Stories

आयशर मोटर्स गुंतवणार 440 कोटी

Patil_p

गो फॅशनचा आयपीओ 17 नोव्हेंबरला

Amit Kulkarni

सोने आयात सहा पटीहून अधिक वाढली

Patil_p

बाजार सलग दुसऱया दिवशी घसरणीत

Amit Kulkarni

25 लाख लहान व्यवसायांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले यश

Amit Kulkarni

‘रोलेक्स रिंग्ज’चा आयपीओ आज होणार खुला

Patil_p