नवीदिल्ली : टीव्हीएस मोटर कंपनीने नुकतीच आपली नवी अपाचे आरटीआर 200 4व्ही ही मोटारसायकल बाजारात सादर केली आहे. या मोटारसायकलीची किंमत एक लाख 23 हजार 500 रुपये (एक्स शोरूम -दिल्ली) आहे. ग्लॉस ब्लॅक व पर्ल व्हाइट या रंगात ही गाडी असणार असून सुपर मोटो एबीएस या नव्या ब्रेकिंग तंत्रज्ञानाची जोड हिला आहे. या गाडीला 197 सीसीचे फोर स्ट्रोक इंजिन आहे. याची इंजिन क्षमता चांगली असून इंधनातही बचत करण्यात ही गाडी हातभार लावते असे कंपनीने म्हटले आहे.


previous post
next post