Tarun Bharat

टीसीएस समभागधारकांना देणार 5 हजार 550 कोटीचा लाभांश

मुंबई

 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या आर्थिक वर्षात 5 हजार 550 कोटी रुपयांचा लाभांश समभागधारकांना देणार आहे. यातील 70 टक्के इतका हिस्सा हा टीसीएसच्या टाटा सन्सकडे आहे. लाभांशाच्या माध्यमातून होणाऱया उत्पन्नामुळे टाटा सन्सची आर्थिक ताकद वाढणार आहे. टाटा सन्स एयर इंडियाकरीता बोली लावू शकते, असेही सांगितले जात आहे. यात अधिग्रहण करण्यासाठी टाटा सन्स इच्छुक असल्याचेही बोलले जात आहे. टाटा ग्रुप आता कोरोना काळात आपला डिजिटल व्यवहार अधिक मजबूत करणार आहे. टीसीएसने 15 रुपयांचा लाभांश जाहीर केलेला आहे. 10 जूनला होणाऱया वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतरच लाभांश वाटला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

इपीएफओ व्याजदराचा फैसला मार्चमध्ये

Patil_p

ग्रेसीम इंडस्ट्रिजचा नफा दमदार

Amit Kulkarni

‘पॉवरग्रिड कॉर्प’चा आयपीओ मार्चपर्यंत

Amit Kulkarni

सरकारची धान्य खरेदी 606.19 लाख टनावर

Patil_p

टाटा मोटर्सची ‘इंडिया की दुसरी दिवाली’ मोहिम

Omkar B

कार्यालयीन गाळय़ांच्या मागणीत घट

Omkar B