Tarun Bharat

टी-20 मानांकनात भारत दुसऱया स्थानी

Advertisements

फलंदाजांत केएल राहुलची तिसऱया स्थानी घसरण

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या टी-20 मानांकनात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. कसोटीमध्ये भारताने याआधीच पहिले स्थान मिळविले असून वनडे मानांकनात भारतीय संघ दुसऱया स्थानावर आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत मात्र केएल राहुलची तिसऱया स्थानी घसरण झाली आहे.

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका 3-2 अशा फरकाने गमविल्यामुळे सांघिक क्रमवारीत त्यांची तिसऱया स्थानावर घसरण झाली आहे. मात्र ते भारतापेक्षा फक्त एका गुणाने मागे आहेत. इंग्लंड संघ अग्रस्थानावर असून भारतापेक्षा ते 7 गुणांनी पुढे आहेत. इंग्लंड व भारत यांच्यात आता पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार असून भारताला हे अंतर कमी करण्याची चांगी संधी या मालिकेत मिळाली आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने दुसऱया स्थानावर मजल मारली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने चांगले प्रदर्शन केले, त्याचा त्याला लाभ झाल्याने त्याची दोन स्थानाने प्रगती झाली आहे. भारताच्या केएल राहुलची मात्र एका स्थानाने घसरण झाली असून तो आता तिसऱया स्थानावर पोहोचला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने सहावे स्थान कायम राखले असून इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गननेही दहावे मानांकन कायम ठेवले आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलनेही तीन स्थानांची प्रगती केली असून त्याने टॉप टेनमध्ये स्थान मिळविताना आठवा क्रमांक मिळविला आहे.

गोलंदाजी व अष्टपैलूंच्या मानांकनात टॉप टेनमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. या प्रकारात अफगाणिस्तानच्या रशिद खानने पहिले स्थान कायम राखले आहे तर त्याचाच संघसहकारी मोहम्मद नबीने अष्टपैलूंमध्ये पहिले स्थान मिळविले आहे. गोलंदाजी मानांकनात ऑस्ट्रेलियाचा स्पिनर ऍश्टन ऍगरने चार स्थानांची प्रगती करीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा स्पिनर ईश सोधीनेही तीन स्थानांची प्रगती करीत आठवे स्थान मिळविले आहे तर लंकन स्पिनर लक्षण संदकनने 9 स्थानांची प्रगती करीत दहावे स्थान पटकावले आहे.

Related Stories

पीएम मोदींची ऑलिम्पिकवीरांसोबत ‘चाय पे चर्चा’

Archana Banage

इंग्लंड टी-20 संघात वोक्सचे पुनरागमन

Patil_p

इंग्लंडचा रोमानियावर निसटता विजय

Patil_p

भारत अ च्या विजयामध्ये, शॉचे अर्धशतक, कुलदीपची हॅट्ट्रीक

Patil_p

भारतीय वनडे संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे

Patil_p

आशिष शहा यांचा ओडिशा एफसीला निरोप

Patil_p
error: Content is protected !!