Tarun Bharat

टी-20 विश्वचषकात रबाडा चौथा हॅट्ट्रिकवीर

वृत्त संस्था/ शारजा

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या इंग्लंडविरूद्ध सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने हॅटट्रीक नोंदविली. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात हॅट्ट्रीक नोंदविणारा रबाडा हा चौथा गोलंदाज आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात रबाडाने आपल्या शेवटच्या षटकात इंग्लंडच्या ख्रिस वोक्स, कर्णधार मॉर्गन आणि जॉर्डन यांना सलग तीन चेंडूवर बाद केले. या सामन्यात इंग्लंडला शेवटच्या षटकांत 14 धावांची जरूरी होती. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला. पण, त्यांना या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली नाही. या गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ उपांत्य फेरीत पात्र ठरले. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यापूर्वी लंकेचा गोलंदाज हसरंगा, कर्टीस कॅम्फर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज बेट लीने हॅट्ट्रीक नोंदविले आहेत.

Related Stories

पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत

Patil_p

विश्वचषक नेमबाजीत भारताला सुवर्णपदक

datta jadhav

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया महिला संघ जाहीर

Patil_p

अख्खा संघ गारद करण्याचा एजाझचा भीमपराक्रम!

Patil_p

रेयान प्रुसेरचा विश्वविक्रम

Patil_p

गुजरात जायंटस्मध्ये गेलचे आगमन

Patil_p