Tarun Bharat

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डीआरएसचे पदार्पण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ओमान आणि संयुक्त अरब अमिरात येथे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘डिसिजन रिव्हयु सिस्टीम’ (डीआरएस) चे पदार्पण होणार आहे. आयसीसीकडून या स्पर्धेत डीआरएसला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱया प्रत्येक संघाला सामन्यातील प्रत्येक डावामध्ये कमाल दोनवेळा डीआरएसचा वापर करता येईल.

गेल्या जूनमध्ये आयसीसीच्या नियंत्रण मंडळाने डीआरएसला अधिकृत मान्यता दिली. क्रिकेटच्या आता सर्व प्रकारामध्ये प्रत्येक संघाला प्रत्येक डावात डीआरएसचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. 2018 साली झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डीआरएसचा वापर सर्व प्रथम करण्यात आला होता. त्याचप्रमाणे 2020 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही डीआरएस सुविधा वापरण्यात आली होती.

Related Stories

आयओसीच्या कोरोना लसीकरण ऑफरची दक्षिण आफ्रिकेकडून समस्यांचे सूर

Patil_p

विंडीजला विजयासाठी 324 धावांचे आव्हान

Patil_p

संधी गमावली. बायर्न म्युनिचचा विजय

Patil_p

सायना, श्रीकांतसमोर ऑलिम्पिक निश्चितीचे लक्ष्य

Patil_p

पंतला आयपीएल स्पर्धा हुकण्याची शक्यता

Patil_p

मोदींचा श्रीजेशला सवाल, पंजाबी शिकलास का?

Amit Kulkarni